बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी सध्या त्यांच्या ‘OMG 2’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने पंकज त्रिपाठींनी बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आतापर्यंत ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘लुडो’, ‘स्त्री’, ‘लुका छुपी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच ते एका युट्यूब वाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी पंकज त्रिपाठींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

हेही वाचा : “प्रिय पप्पा…”, सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट

पंकज त्रिपाठी वैयक्तिक आयुष्याबाबत सांगताना Mashable या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “माझ्या वडिलांना मी करत असलेल्या कामाबद्दल फारशी माहिती नाही आणि माझ्या कामगिरीचा त्यांना फारसा अभिमानही वाटत नाही. सिनेमागृह आतून कसे असते? हे त्यांनी कधीच पाहिलेले नाही. त्यांनी माझे काम संगणकावर किंवा टेलिव्हिजनवर पाहिले असेल.”

हेही वाचा : “दुबईहून येताना मला समीर वानखेडेंनी विमानतळावर अडवलं अन्…”, क्रांती रेडकरने सांगितला २०१० मध्ये घडलेला किस्सा

आईबद्दल सांगताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “माझी आई टेलिव्हिजन पाहते पण, ती माझा अभिनय न पाहता मी कसा दिसतो? बारीक झालो नाही ना? या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवते. मला फोन करून अनेकदा खात जा, झोपत जा…बारीक झाला आहेस असे सांगत असते.”

हेही वाचा : ‘जलसा’मधील ‘ही’ आहे अमिताभ बच्चन यांची आवडती जागा; ब्लॉगच्या माध्यमातून खुद्द बिग बींनी केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून माझ्याकडे एकच मोबाइल फोन आहे. मला अनेक लोक विचारतात तुम्ही व्हॉट्सॲप वापरत नाही का? त्यावर माझे उत्तर ‘नाही’ असे असते. माझ्याकडे कित्येक वर्ष एकच फोन नंबर असून मी व्हॉट्सॲप अजिबात वापरत नाही. आयुष्यात पहिल्यांदा घेतलेली i10 ही कार आणि माझी मोटारसायकल माझ्याकडे अजूनही आहे. या दोन गाड्यांना माझ्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे.” दरम्यान अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘OMG 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.