ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे ४० वर्षांहून अधिक काळापासून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी विनोदी पात्रं साकारली, गंभीर भूमिका केल्या आणि खलनायकाच्या भूमिकाही केल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलांच्या करिअरबद्दल माहिती दिली, तसेच बॉलीवूडमधील नेपोटिझमच्या वादावर परखड भाष्य केलं.

परेश रावल यांची मुलं अभिनय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांचा मुलगा आदित्य रावल याने २०२० मध्ये ‘बमफाड’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि अनिरुद्ध रावलने ‘सुलतान’ (२०१७), ‘टायगर जिंदा है’ (२०१७) चित्रपट आणि ‘स्कूप’ (२०२३) या सीरिजमध्ये काम केलंय.

सलमान खानच्या करीअरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट; दिग्दर्शकाने नंतर सिनेमे बनवणं सोडलं, तर अभिनेत्रीने…

मुलांबद्दल परेश रावल यांचे वक्तव्य

तुम्ही मुलांना सिनेसृष्टीत येण्यात मदत केली का? आणि नेपोटिझमवर तुमचं मत काय? असं विचारल्यावर परेश रावल म्हणाले, “माझी मुलं त्यांच्या स्वत: च्या आवडीनुसार काम करत आहेत. जोपर्यंत ते चुका करत नाहीत तोपर्यंत ते शिकणार नाहीत. त्यांनी मला येऊन विचारलं तरच मी सल्ला देईन. त्यांनी मला विचारलं नाही तर मी त्यांना काहीही सांगत नाही. त्यांना स्वतःचा मार्ग शोधू द्या. त्यांना चुका करू द्या, त्यांना स्वतः शिकू द्या यावर माझा विश्वास आहे. पण मला एक गोष्ट नक्की माहीत आहे, ते खूप मेहनती आणि खूप हुशार आहेत. त्यांनी बॉलीवूडमध्ये येण्यासाठी माझ्या नावाचा वापर केलेला नाही.” यासंदर्भात ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिलंय.

Animal vs Sam Bahadur: ‘अ‍ॅनिमल’ ‘सॅम बहादुर’ वर पडला भारी, विकी कौशलच्या चित्रपटाने कमावले फक्त…

नेपोटिझमवर परेश रावल यांचं परखड मत

नेपोटिझमवर परेश रावल म्हणाले, “मला वाटतं की नेपोटिझम हा फालतूपणा आहे. माझा मुलगा जर रणबीर कपूर किंवा आलिया भट्ट इतका प्रतिभावान असता तर मी त्याच्यावर माझे सगळे पैसे लावले असते. आणि मी त्यांच्यावर पैसे का लावू नये? कारण यात काहीच चुकीचं नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणार नाही मग काय, केस कापणारा होईल का? नेपोटिझमच्या नावाने ओरडणाऱ्या लोकांना विचारा की ते त्यांच्या वडिलांचा वारसा एवढ्या आनंदाने का स्वीकारतात. त्याऐवजी तुमच्या शेजाऱ्याला द्या ना.”

ताजमध्ये वेटर, १४ वर्षे बेकरीत केलं काम अन् ४४ व्या वर्षी बॉलीवूड पदार्पण; जाणून घ्या बोमन इराणींची एकूण संपत्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, परेश रावल येत्या काळात अक्षय कुमारबरोबर ‘वेलकम टू द जंगल’ आणि अक्षय आणि सुनील शेट्टी यांच्याबरोबर ‘हेरा फेरी ३’ मध्ये दिसणार आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटात दमदार स्टारकास्ट आहे, असं परेश यांनी सांगितलं. तसेच ‘हेरा फेरी ३’ साठी २०२४ च्या मार्च किंवा एप्रिलमध्ये शूटिंग सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.