अभिनेत्री परिणीती चोप्रा बॉलीवूड दुनियेपासून दूर राहून वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. लग्न झाल्यापासून परिणीती प्रत्येक सण सासरच्यांबरोबर दिल्लीत साजरा करताना पाहायला मिळत आहे. अशातच सध्या परिणीतीचा कल अध्यात्माकडेही वाढला आहे. त्यामुळे अलीकडेच परिणीती पती आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर वाराणसीमध्ये पोहोचली होती; जिथे मिस्टर अँड मिसेस चड्ढा मनोभावे पूर्जा-अर्चा करताना पाहायला मिळाले. वाराणसी दौऱ्यातील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं वाराणसीच्या घाटावर गंगा आरतीमध्ये तल्लीन झालेले दिसत आहेत. रविवारी रात्री परिणीती आणि राघव चड्ढा गंगा आरतीमध्ये सामिल झाले होते. दशाश्वमेध घाटावर दोघांनी आरती केली आणि यावेळी दोघांबरोबर कुटुंबातील इतर सदस्य देखील होते. परिणीती आणि राघव चड्ढा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”

दरम्यान, आज ( ११ नोव्हेंबर ) राघव चड्ढा यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने परिणीतीने सोशल मीडियावर भलीमोठी सुंदर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांचं कौतुक करत परिणीतीने एक वचन दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली की, मी तुमच्याकडून शिकणं कधीही थांबवणार नाही. मी देवाची खूप कृतज्ञ आहे, त्यांनी मला सर्वोत्कृष्ट व्यक्ती दिला आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रागाई. परिणीतीची ही सुंदर पोस्ट खूपच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणीती चोप्राच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘अमर सिंह चमकीला’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात परिणीती दिलजीत दोसांझबरोबर पाहायला मिळाली होती. इम्तियाज अलीने ‘अमर सिंह चमकीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट फक्त ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. याशिवाय परिणीतीकडे ‘जहूर’, ‘शिद्दत 2’, ‘प्रेम की शादी’ आणि ‘सनकी’सह बरेच चित्रपट आहेत. लवकरच तिचे हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.