बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आता मिसेज चड्ढा झाली आहे. २४ सप्टेंबरला परिणीती चोप्राने आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर सात फेरे घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केली. या खास क्षणाचे फोटो परिणीती आणि राघव यांनी २५ सप्टेंबरला सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे सध्या परिणीतीच्या लग्नातील लूक पासून ते तिच्या मंगळसूत्रापर्यंतची चर्चा सुरू आहे. बरेच लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता लग्नातील परिणीती आणि राघव चड्ढा यांचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

लग्नातील हा कपल डान्स व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये परिणीती आणि राघव डान्स करताना पाहायला मिळत आहे. दोघं छत्री घेऊन डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: जेसीबीनं सासरी पोहोचली राखी सावंत; व्हिडीओ पाहून नेटकरी वैतागले, म्हणाले, “कोणीतरी जाऊन तो जेसीबी उलटा करा”

उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पंजाबी पद्धतीत परिणीती आणि राघव यांचं लग्न झालं. त्यानंतर परिणीती काल २५ सप्टेंबरला राघव यांच्याबरोबर दिल्लीत म्हणजे सासरी पोहोचली. दिल्ली विमानतळावरील या नवविवाहित जोडप्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावेळी परिणीती नियॉन रंगाचा ड्रेस, हातात चुडा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपरिक लूक दिसली.

हेही वाचा – Video: गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? लिटिल चॅम्प्सनं दिलेलं उत्तर ऐकून मृण्मयी देशपांडे झाली थक्क

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लवकरच हे जोडपं जवळच्या मित्रमंडळींना दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. मुंबईतील रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजेरी लावण्याची शक्यता आहे.