बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने २४ सप्टेंबर २०२३ रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढांसह उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांचा शाही विवाहसोहळा उदयपूरच्या ‘द लीला पॅलेस’मध्ये पार पडला. या जोडप्याचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या लग्नाचा भरजरी लेहेंगा सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता.

हेही वाचा : “आधी ‘पुढचं पाऊल’ आता ‘ठरलं तर मग’”, जुई गडकरीने दिला जुन्या आठवणींना उजाळा; म्हणाली, “त्या मालिकेने मला…”

परिणीती चोप्राचा लूक फायनल करताना मनीष मल्होत्राने छोट्या-छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं होतं. परिणीतीने लग्नाच्या भरजरी लेहेंग्यावर तिच्या आजीचा छल्ला घातला होता. याचा खुलासा परिणीती चोप्रा आणि मनीषने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत केला आहे.

हेही वाचा : “अंगावर गोष्टी काढू नका”, अमृता खानविलकरने स्त्रियांना दिला महत्त्वाचा सल्ला, स्वत:च्या मावशीचा अनुभव सांगत म्हणाली…

मनीष मल्होत्रा याबद्दल लिहितो, “परिणीतीने मला आजीची आठवण म्हणून तिचा छल्ला लग्नाच्या लेहेंग्यामध्ये जोडण्यास सांगितला होता. तो छल्ला तिची आजी कायम वापरत असे. लग्न मंडपात चालताना आजीच्या छल्ल्याचा आवाज येणं ही परिणीतीसाठी खूप मोठी ताकद होती. तिच्यासाठी हा छल्ला म्हणजे केवळ एक दागिना नसून तिच्या आजीची आयुष्यभराची आठवण आहे.” मनीष मल्होत्राच्या कलात्मकतेने परिणीती चोप्राचंही मन जिंकलं आहे.

हेही वाचा : “ठार वेडे आहात…”, हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून प्रसाद ओकची बायको भारावली, पोस्ट शेअर करत केलं कौतुक

parineeti chopra
परिणीती चोप्रा

दरम्यान, उदयपूरमध्ये संपन्न झालेल्या राघव-परिणितीच्या शाही लग्नानंतर लवकरच ते बॉलीवूड सेलिब्रिटी आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना रिसेप्शन पार्टी देणार आहेत. दिल्ली आणि मुंबईत या पार्ट्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच आणखी एक रिसेप्शन ३० सप्टेंबरला चंदीगढमध्ये होण्याची शक्यता आहे. राघव-परिणीतीची रिसेप्शन निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.