परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची लगबग आता सुरू झाली आहे. केवळ १५० लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. शिवाय करण जोहरसह फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा परिणीतीच्या साखरपुड्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. दिल्लीच्या कपूरथला हाऊसबाहेर गाड्यांची गर्दी तसेच पाहुणे मंडळींची गर्दी सुरू झाली आहे.

‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राघव यांचे काका पवन सचदेवा यांना या दोघांच्या साखरपुड्याबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा ते म्हणाले की, “राघवला खूप कमी गोष्टी आवडतात”. शिवाय प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांनीही परिणीतीच्या साखरपुड्याबाबत आनंद व्यक्त केला होता. आता परिणीती व राघवच्या साखरपुड्याच्या फोटोंची चाहते वाट पाहत आहेत. मात्र या कार्यक्रमात फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आणखी वाचा – राणादाने पाठकबाईंना किस करतानाचा फोटो शेअर केला अन्…; मराठमोळ्या जोडप्याच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत मधु चोप्रा यांनी म्हटलं होतं की, “मी परिणीती व राघवसाठी खूप खुश आहे. आमचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी कायम आहेत”. या दोघांच्या साखरपुड्याला अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. तर प्रियांका साखरपुड्यादरम्यानचा एक फोटो इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – “तर मी माझ्या मुलीसाठी देशही सोडणार आणि…” लेक मालतीबाबत बोलताना प्रियांका चोप्राने केलेलं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रियांकाने तिच्या ड्रेसचा फोटो शेअर केला आहे. शिवाय ती आता कपूरथला हाऊसलाही पोहोचली आहे. गाडीमधूनच पापाराझी छायाचित्रकारांना प्रियांका पोझ देताना दिसत आहे. तसेच बहिणीच्या साखरपुड्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. शिवाय मनिष मल्होत्राचाही साखरपुड्याला पोहोचला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता परिणीती व राघव यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.