बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा २४ सप्टेंबरला विवाहबंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. परिणीती आणि राघव यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नानंतर आता सगळ्यांना त्यांच्या रिसेप्शनची ओढ लागली आहे.

हेही वाचा- Video: ना व्हीआयपी रांग, ना सुरक्षारक्षक…; Miss World मानुषी छिल्लरने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, अभिनेत्रीचा साधेपणा पाहून नेटकरी म्हणाले…

लग्नानंतर परिणीती आणि राघव ३ ठिकाणी रिसेप्शन देणार असल्याची माहिती समोर आली होती. मुंबई, दिल्ली आणि चंदीगढमध्ये. बॉलीवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत, राजकीय नेत्यांसाठी दिल्लीत आणि नातेवाईकांसाठ चंदीगढमध्ये परिणीती आणि राघव रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता दिल्ली आणि चंदीगढमधील रिसेप्शनचा विचार तुर्तास रद्द करण्यात आला असून फक्त मुंबईतच रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ४ ऑक्टोबरला मुंबईत परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचं रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे. या रिसेप्शनला बॉलीवूडमधील अनेक तारे-तारका सहभागी होणार आहेत. परिणीतीने आपल्या लग्नात केवळ जवळच्या मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईकांनाच आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आता रिसेप्शनमध्ये परिणीतीचे सहकलाकार आणि इतर कलाकारांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

हेही वाचा- Tiger Ka Message : “जब तक टायगर मरा नहीं…” सलमान खानच्या ‘टायगर ३’चा पहिला प्रोमो प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थाटामाटात लग्न केल्यावर परिणीती आणि राघव दिल्लीत दाखल झाले. सासरी परिणीतीचं जोरदार स्वागत करण्यात आले. याचे काही व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेली बरेच महिने परिणीती व राघवच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या. इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्रित पाहिलं गेलं. मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. अखेर मे महिन्यात दिल्लीमध्ये साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.