बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाबाबत सध्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आप खासदार राघव चड्ढा व परिणीतीला स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या नात्याबाबत चर्चा रंगली आहे. परिणीती राघव चड्ढा यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

परिणीती व राघव चड्ढा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साखरपुडा करणार असल्याचंही वृत्त आहे. याचदरम्यान परिणीतीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी पापाराझींशी बोलताना परिणीतीने लंडनला जात असल्याचं सांगितलं. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन परिणीतीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “मी लंडनला जात आहे. बोर्डिंग पास दाखवू का?” असं परिणीती या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा>> “थँक गॉड, उर्वशी इथे नाही…”, IPLमध्ये ‘ते’ पोस्टर घेऊन उभ्या असलेल्या मुलीचा फोटो अभिनेत्रीने केला शेअर, म्हणाली…

हेही वाचा>> लग्नानंतर सहा वर्षांनी आई झालेल्या बिपाशाने पहिल्यांदाच शेअर केले लेकीचे गोड फोटो, म्हणाली “देवी…”

परिणीतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिणीती व राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीत पार पडणार असल्याची माहिती होती. यासाठी तयारी सुरू असून प्रियांका चोप्रानेही भारतातील ट्रीप यामुळेच प्लॅन केल्याचं वृत्त होतं. परंतु, आता परिणीती लंडनला जात असल्यामुळे तिथे त्यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा>> ‘आदिपुरुष’मधील हनुमानाचा लूक समोर, प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारणार भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आप खासदार राघव चड्ढा व परिणीती चोप्रा गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये शिक्षणादरम्यान त्यांची ओळख झाली होती. तेव्हापासून ते चांगले मित्र आहेत.