बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याबरोबर परिणीताला स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतरही राघव चड्ढा व परिणीती चोप्रा अनेकदा एकत्र दिसून आले. त्यांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा व परिणीती चोप्रा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अखेर यावर परिणीती चोप्राने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. परिणीतीने नुकतीच ‘लाइफ एशिया इंडिया’ला मुलाखत दिली. “स्पॉटलाइट आणि मीडियामध्ये होणाऱ्या चर्चांकडे तू कसं पाहतेस?” असा प्रश्न परिणीतीला या मुलाखतीत विचारण्यात आला. परिणीतीने राघव चड्ढा यांचं नाव न घेता सध्या सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं.

हेही वाचा>> “शत्रूबरोबरही असं कोणी वागू नये…” रोनित रॉय यांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत, स्मृती इराणी कमेंट करत म्हणाल्या…

“जर मी कोणी नसते किंवा माझ्याबद्दल जाणून घेण्यात त्यांना उत्सुकता नसती, तर एक अभिनेत्री म्हणून मी यशस्वी झाले आहे, असं मला वाटलं असतं. कारण, यशस्वी कलाकार हा प्रसिद्ध असतो. प्रत्येकाला तो आपल्या घरातला वाटतो. न्यूज चॅनेल, वर्तमानपत्रात त्याच्याबद्दल छापून येतं,” असं परिणीती म्हणाली.

हेही वाचा>> “शत्रूबरोबरही असं कोणी वागू नये…” रोनित रॉय यांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत, स्मृती इराणी कमेंट करत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करणं याला काही मर्यादा आहेत. या मर्यादा ओलांडणं हे अपमानास्पद आहे. तसं काही झालं, किंवा माझ्याबाबत कोणी चुकीची माहिती दिली, तर मी त्या गोष्टींचं नक्की स्पष्टीकरण देईन. जर माझ्याबद्दल जाणून घेण्यात लोकांना उत्सुकता नसती, तर मी स्वत:ला अयशस्वी समजलं असतं. माझ्या आयुष्याबाबत लोकांना जाणून घेण्यात उत्सुकता आहे, याचा अर्थ मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी झाले आहे. मी या सगळ्या गोष्टींकडे अशाप्रकारे पाहते.”