बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान विविध कारणांनी चर्चेत येत असतो. सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची हवा आहे. त्याचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबरीने या ट्रेलरमध्ये सलमान खान दिसणार अशी चर्चा आहे. यावर निर्मात्यांनी भाष्य केलं आहे.
शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण चित्रपट वर्षाच्या सुरवातीलाच येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीझरनंतर आता उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलरमध्ये साल्मन खान दिसणार का यावर बॉलिवूड हंगामाला मिळलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते यांनी सस्पेन्स ठेवला आहे. त्यांच्या मते चित्रपटाचे दोन ट्रेलर बनवण्यात आले आहेत ज्यात एकात सलमान खान दिसणार आहे आणि एकामध्ये नाही.
रॉकी भाई पुन्हा एकदा करणार ‘सलाम’! ‘केजीएफ’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा यांना फक्त सलमानची झलक दाखवायची आहे त्याच्या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती उघड करायची नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काहीदिवस बाकी आहेत, ट्रेलर १० तारखेला येत असल्याने शाहरुखचे चाहते याची वाट बघत आहेत.
शाहरुख खानच्या ‘पठाण’चा ट्रेलर लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
या चित्रपटातून शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पुनरागमन करतोय. यापूर्वी तो रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण, अब्राहम दिसणार आहेत.