Actress recalls being scared of having a miscarriage: कबीर बेदी हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी नायक व खलनायकाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.इतकेच नाही तर ८० व ९० च्या दशकात त्यांनी टीव्ही मालिकांतही काम केले. भारताबरोबरच त्यांनी इटालियन टीव्ही मालिकांमध्ये काम केले. अभिनेत्याची लोकप्रियता मोठी होती. असे असले तरी त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आलेले दिसले.
“मी कल्पना करू शकत नाही”
कबीर बेदींच्या मुलाचे २६ व्या निधन झाले. सिद्धार्थ कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून सन्मानाने पदवीधर झाला होता. त्याला स्किझोफ्रेनियाचे निदान झाले, ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. याचदरम्यान, कबीर बेदी आर्थिक संकटाचा सामना करत होते.
आता कबीर बेदी यांची मुलगी अभिनेत्री पूजा बेदीने नुकतीच सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत पूजा बेदी तिच्या लहान भावाच्या निधनाबद्दल वक्तव्य केले. पूजा बेदी म्हणाली, “जेव्हा मी गर्भवती होते. त्यावेळी माझ्या भावाने आत्महत्या केली.त्याच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का बसला होता. जेव्हा त्याचा मृत्यू झाला, त्यावेळी माझे वडील त्याच्याबरोबर अमेरिकेत होते. त्यांच्यासाठी ते खूप कठीण होते. ते त्याच्या खोलीत गेले आणि त्यांनी भावाने आत्महत्या केल्याचे पाहिले. त्या वेळी त्यांना काय सहन करावे लागले असेल याची मी कल्पना करू शकत नाही.”
”गर्भपात होण्याची भीती….”
पूजा पुढे म्हणाली, “मी गर्भवती होते, त्यामुळे मला भावनिक स्थैर्यता राखणे गरजेचे होते.माझ्या भावनांचा माझ्या बाळावर काही परिणाम होऊ नये, यासाठी माझ्या घरच्यांनी मला शांत कऱण्याचा प्रयत्न केला. गर्भपात होण्याची भीती वाटत होती. मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते. पण, मला कुठेतरी हे माहित होते की त्याचा प्रवास संपला आहे.”
पूजा हेही उघड केले की सिद्धार्थने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबासाठी एक छान मेसेज लिहिला होता. ती म्हणाली, “त्याने माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी खूप गोड संदेश लिहिला होता. त्याने माझ्या आईला एक पत्रही लिहिले. तसे घग, पण त्याने त्याचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. कधी कधी असे वाटते की त्याने गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळल्या असत्या. तर आज तो जिवंत असता.”
सिद्धार्थ अमेरिकेत आणि पूजा भारतात असल्याने दोघांच्यात भौगोलिक आणि भावनिक दुरावा होता. पूजा म्हणाली, “तो अमेरिकेत होता. मी भारतात होते. मी आयुष्यात वेगळी आव्हाने होती. विवाहित असल्याने परिपूर्ण पत्नी बनण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान त्याला आजाराचे निदान झाले. पण, त्यांनी योग्य निदान केले नाही. सुरुवातीला त्यांनी त्याला नैराश्य असल्याचे म्हटले. त्यानंतर त्याला बायपोलर डिसऑर्डर निदान केले. त्यानंतर . स्किझोफ्रेनिया निदान झाले. पण या सगळ्यात वेळ गेला होता.”
बालपणीच्या त्यांच्यात कसे नाते होते, याबद्दल पूजा बेदी म्हणाली, “मी आणि माझा भाऊ एकमेकांपासून कधीही वेगळे व्हायचो नाही. आम्ही अनेक गोष्टी शेअर करायचो. एक बेडरुम, कधीकधी टूथब्रश आम्ही शेअर करायचो. आमचे मित्रही सारखेच होते, आम्हाला सारखेच जेवण आवडायचे आणि आम्ही एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये जात होतो. तो माझ्यापेक्षा फक्त दीड वर्षांनी लहान होता. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो.”