scorecardresearch

७५ वेळा रिजेक्ट झालेल्या विद्या बालनला प्रदीप सरकार यांनी बनवलं स्टार; ‘परिणीता’मध्ये ‘या’ कारणाने तिला दिलेली मुख्य भूमिका

विद्या चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होती आणि अशातच ती ‘परिणीता’साठी कास्टिंग करत असलेले चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या कार्यालयात पोहोचली.

pradeep-sarkar-vidya-balan
(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन झालं. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनीच्या आजाराशी झुंज देणाऱ्या प्रदीप यांची आज शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता प्राणज्योत मालवली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना बॉलिवूड कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.

‘परिणीता’, ‘मर्दानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन

प्रदीप सरकार यांनी विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या ‘परिणीता’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. खरं तर त्या चित्रपटासाठी विद्याची निवड करण्याचं श्रेय त्यांना जातं. त्या काळी विद्या चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होती, तिला काही तमिळ व मल्याळम चित्रपटात साइन केल्यानंतर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, त्यामुळे तिला काम मिळत नव्हतं. जवळपास ७५ रिजेक्शन झेललेल्या विद्याला प्रदीप सरकार यांनी मुख्य भूमिका करण्याची संधी दिली होती.

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा खरंच एकमेकांना डेट करत आहेत? समोर आलं सत्य

विद्या चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होती आणि अशातच ती ‘परिणीता’साठी कास्टिंग करत असलेले चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या कार्यालयात पोहोचली. परिणीताचे संगीतकार शंतनू मोईत्रा यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, विद्या त्यांना विधू विनोद चोप्रांच्या ऑफिसमध्ये भेटली तोपर्यंत तिला सुमारे ७५ वेळा ऑडिशनमध्ये नकार देण्यात आला होता.

Video: गोष्ट पडद्यामागची: सचिन पिळगावकरांवर हल्ला झाला म्हणून मित्रानं ‘ते’ हॉटेलच खरेदी केलं; पाहा अनोख्या मैत्रीची गोष्ट!

‘दैनिक भास्कर’शी संवाद साधताना प्रदीप सरकार यांनी ‘परिणीता’च्या कास्टिंगचा किस्सा सांगितला होता. विधू यांनी १३-१४ वेळा विद्याची टेस्ट घेतली होती. १५व्या वेळी त्यांनी पत्नीला बोलावून सांगितले, ‘बघ माझी ललिता सापडली आहे.’ दुसरीकडे विद्याला मात्र नकारच मिळेल, अशी खात्री होती. त्यामुळे प्रदीप यांनी फोन केल्यावर तिने उचलला नाही. ती एका कॉन्सर्टमध्ये होती आणि तिला तो कॉन्सर्ट एंजॉय करता येत नसल्याने ती फोन बंद करण्याचा विचार करत होती. अशातच विद्याला कोणीतरी मेसेज केला होता की ‘तू परिणीता झाली आहेस, तुझा संघर्ष संपला आहे.’ हा मेसेज वाचून विद्या तिथून बाहेर पडली आणि गुडघ्यावर बसून रडू लागली होती.

प्रदीप सरकार यांनी विधू यांना एक छोटासा बदल सुचवला होता, त्यानंतर विद्याचा ‘परिणीता’मधील लूक पूर्ण झाला होता. मधल्या काळात काही कारणास्तव प्रदीप व विद्या यांच्यात काही कारणाने दुरावा आलेला, पण नंतर पाच वर्षांनी दोघांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं आणि दुरावा मिटला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 13:35 IST

संबंधित बातम्या