अभिनेता प्रतीक बब्बर हा त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. २३ जानेवारी २०१९ रोजी प्रतीक सान्या सागरसोबत विवाह बंधनात अडकला. त्यापूर्वी अनेक दिवस ते एकेमेकांना डेट करत होते. परंतु लग्नाच्या एक वर्षानंतरच त्यांच्यात वाद होऊ लागल्याचं समोर आलं होतं. लॉकडाऊनदरम्यान या दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा प्रतीक प्रेमात पडला असल्याचे समोर आलं आहे. प्रतीकने स्वतः त्याची रिलेशनशिप जगजाहीर केली आहे.

गेले अनेक महिने प्रतीक अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना अनेकदा एकत्र पाहण्यातही आलं. आतापर्यंत त्या दोघांनी कधी त्यांच्या नात्याविषयी उघडपणे भाष्य केलं नव्हतं. तर काल व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रतीकने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तो प्रिया बॅनर्जीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने सांगितलं.

आणखी वाचा : “स्मिता पाटीलचा मुलगा म्हणून…” प्रतीक बब्बरने व्यक्त केली होती इच्छा

काल प्रतीकने दोन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यातील पहिल्या फोटोत तो आणि प्रिया पाठमोरे उभे असलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या दोघांच्याही हातावर पी बी असं लिहिलेला टॅटू दिसत आहे. हे दोन फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “पी बी” तर त्यासोबतच एक हार्ट इमोजीही टाकला.

हेही वाचा : “मी आयुष्याची वाट लावून घेतली होती त्याला आई जबाबदार…” प्रतीक बब्बरचा धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रिया आणि प्रतीक एकमेकांना जवळपास एक-दीड वर्षापासून डेट करत आहेत. छोट्या पडद्यावरील एका कॉमन मित्राच्या मदतीने ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. प्रिया बॅनर्जीबद्दल सांगायचे तर, तिने संजय गुप्ता यांच्या ‘जज्बा’ चित्रपटातून ‘सिया’ची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.