अभिनेत्री प्रीती झिंटा आज ३१ जानेवारी रोजी तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळच्या या आघाडीच्या अभिनेत्रीने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हिंदी सिनेसृष्टीसह तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं. सध्या तिने अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेतली आहे.

१९९८ पासून प्रीतीने तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात केली. १९९९ साली तिचा ‘सोल्जर’ हा चित्रपट हिट झाला आणि तिला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. प्रीतीच्या सहकलाकारांना ती खूप आवडायची. दिग्गज कलाकारांनीही तिच्या कामाचं कौतुक केलं होतं. बिग बी अमिताभ बच्चन यांनी तिला एक प्रामाणिक अभिनेत्री म्हटलं होतं तर सलमानने लग्नासाठी पत्नी म्हणून प्रीती चालेलं असंही म्हटलं होतं.

हेही वाचा… अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘या’ पुरस्काराने गौरव; अभिनेत्री म्हणाली, “भारतीय म्हणून मला….”

सलमान खान आणि प्रीती झिंटाची जोडी त्याकाळी खूप हिट होती. ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘दिलने जिसे अपना कहा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्रित काम केलं होतं. एकदा ते दोघेही परदेशात फिरायला गेले होते. यादरम्यान ते एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली. एका मुलाखतीत लग्नासाठी कशी मुलगी हवी? असं सलमानला विचारलं असता सलमान म्हणाला होता, “लग्नासाठी मला प्रीती झिंटा एक योग्य जोडीदार वाटते.” हे विधान त्याकाळी खूप चर्चेत राहिलं होतं.

भारतीय सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन नव्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देताना दिसतात. प्रीती झिंटाने अमिताभ बच्चन यांच्यासह ‘लक्ष्य’, ‘झूम बराबर झूम’ ‘कभी अलविदा ना कहना’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं होतं. प्रीती झिंटाबाबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, “कोणाची ओळख नसतानाही एकट्या मुलीने या इंडस्ट्रीत तिची स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या कामाप्रती खूप प्रामाणिक आहे. तिच्या इच्छाशक्ती आणि धैर्याचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे.”

हेही वाचा… “विनोद आणि त्यांचं टायमिंग खऱ्या अर्थाने…”, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर केदार शिंदेंची पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रीती झिंटाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर प्रीती झिंटाने तिच्याहून १० वर्षे लहान असलेल्या जीन गुडइनफशी गुपचूप लग्न केलं होतं. जीन हा अमेरिकन आहे आणि त्यांना दोन जुळी मुलं देखील आहेत. प्रीती आपल्या पती आणि मुलांसह लॉस एंजेलिसमध्ये राहते.