अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या हॉलीवूड प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही वेब सीरिज ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा होती. तर आता या सीरिजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सीरिजने आता नवा विक्रम नोंदवला आहे. मात्र, सध्या प्रियांका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सध्या प्रियांकाचा ‘मेट गाला इव्हेंट २०२३’मधील लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या वेळी प्रियांकाने गळ्यात घातलेल्या नेकलेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा- “तिचं लग्न झालं होतं पण..”; अनुपम खेर यांनी सांगितला किरण खेर यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा

‘मेट गाला इव्हेंट २०२३’मध्ये प्रियांका तिचा पती निक जोनसबरोबर सहभागी झाली होती. या वेळी दोघांनी एकाच रंगाचे कपडे घातले होते. काळ्या गाऊनमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती. या वेळी प्रियांकाने ११.६ कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांकाच्या नेकलेसची किंमत २५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २०४ कोटी रुपये आहे. ‘मेट गाला’नंतर प्रियांकाच्या या नेकलेसचा लिलाव केला जाणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Patty Cardona (@jerryxmimi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिची अमेरिकन वेब सीरिज ‘सिटाडेल’ नुकतीच प्रदर्शित झाली. प्रियांकाच्या या अॅक्शन थ्रिलर मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘सिटाडेल’मध्ये प्रियांकाबरोबर रिचर्ड मॅडेन, स्टॅनले टुसी आणि लेस्ली मॅनविलेदेखील आहेत. या अमेरिकन वेबसीरिज भारतीय वर्जनमध्येही बनविण्यात येणार आहे. वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीत असतील. प्रियांकाचा रोमँटिक कॉमेडी ‘लव्ह अगेन’ही याच महिन्यात रिलीज होत आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत सॅम ह्युघन आणि सेलीन डिऑनदेखील आहेत. तसेच ती फरहान अख्तरच्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे.