सध्या बॉलिवूड असो किंवा मराठी चित्रपट रिमेक्सची चांगलीच हवा आहे. गेली बरीच वर्षं बॉलिवूडने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनवले. त्यापैकी बरेच चित्रपट गाजले तर काही सपशेल आपटले. ८० आणि ९० च्या दशकातील बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांचे रिमेकसुद्धा आपल्याला बघायला मिळाले.

नुकतंच बॉलिवूडचे दिग्दर्शक निर्माते बोनी कपूर यांनी रिमेकसंदर्भात भाष्य केलं आहे. १९८७ साली आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाच्या रिमेकबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. ‘पिंकव्हीला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोनी कपूर म्हणाले, “मी मिस्टर इंडिया २ बनवेन. लवकरच मी यावर काम सुरू केल्यावर कुणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. माझ्या ‘वॉन्टेड’. ‘नो एन्ट्री’, ‘मिस्टर इंडिया’सारख्या चित्रपटांच्या दुसऱ्या भागाची प्रचंड मागणी होताना दिसत आहेत.”

आणखी वाचा : दुसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ची तुफान कमाई सुरूच, रितेश देशमुखने पोस्ट शेअर करत मानले आभार; नेटकरी म्हणाले…

इतकंच नव्हे तर लवकरच बोनी कपूर अभिनयातसुद्धा पदार्पण करणार आहेत. ते एक उत्तम निर्माते आहेतच पण आता ते अभिनयातही त्यांचं नशीब आजमावून पाहणार आहेत. लव्ह रंजन दिग्दर्शित ‘तू झुठी मै मक्कार’ या चित्रपटात ते अभिनय करताना दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी बोलताना बोनी कपूर म्हणाले, “मी सुरुवातीला हा चित्रपट नाकारणार होतो, पण नंतर लव रंजनने येऊन माझी समजावून सांगितलं. हा खूपच वेगळा अनुभव होता आणि अभिनयात मी माझं योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे याचा मला आनंद आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडेल अशी आशा आहे.” या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी प्रथमच पडद्यावर झळकणार आहे.