Honey singh speaks about Urfi javed : मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या चित्र-विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नुकतंच उर्फी आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद समोर आला आहे. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन” असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर हा वाद चांगलाच वाढला असून यामध्ये बऱ्याच लोकांनी उडी घेतली आहे.

आता बॉलिवूडचा रॅपर आणि गायक हनी सिंगनेसुद्धा नुकतंच उर्फीबद्दल वक्तव्य केलं आहे. फक्त हनी सिंगचं हे वक्तव्य उर्फीचं कौतुक करणारं आहे. भविष्यात त्याला उर्फीबरोबर नक्कीच काम करायला आवडेल असं त्याने वक्तव्य केलं आहे. हनी सिंगच्या या वक्तव्यामुळे त्याला बरंच ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा : “…पण माझा नंगानाच सुरूच राहील”, उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना टोला

‘फिल्मीबीट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हनी सिंगने यावर भाष्य केलं आहे. शिवाय तो लवकरच तिच्याबरोबर काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हनी सिंग म्हणाला, “मला ही मुलगी प्रचंड आवडते. ती प्रचंड बोल्ड आणि धाडसी आहे. स्वतःचं आयुष्य ती स्वतःच्या अटींवर जगते. देशातील सगळ्या मुलींनी तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं.”

आणखी वाचा : उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं; भगवा ड्रेस परिधान करत ‘बेशरम रंग’ गाण्यावर व्हिडीओ बनवला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भविष्यात उर्फीबरोबर काम करण्याबाबत हनी सिंगने होकार दिला, आणि याबद्दल तो बोलला की, “नक्कीच जर मला एखादं गाणं मिळालं ज्यामध्ये ती उत्तम काम करू शकेल मी जरूर तिच्याबरोबर काम करेन. माझ्याकडून तिला भरपूर शुभेच्छा आणि पाठिंबा.” नुकतंच हनी सिंगने त्याच्या मानसिक आजाराविषयी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. हनी सिंगच्या या वक्तव्याने सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.