बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत आपल्या अभिनयाबरोबरच तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. कंगना नेहमी आपलं मत बिदास्तपणे मांडताना दिसते. कदाचित त्यामुळे तिचे बॉलिवूडमध्ये मित्र कमी आणि शत्रू जास्त आहेत. नुकतेच अभिनेता आर माधवनने कंगनाबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. कंगना आणि आर माधवन यांनी ‘तन्नू वेड्स मन्नू’ आणि ‘तन्नू वेड्स मन्नू २’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. कंगनाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना अभिनेत्याने कंगनाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

हेही वाचा- शाहरुख खानने सुप्रसिद्ध मॉडलेला ‘मन्नत’मध्ये जेवणासाठी केलं आमंत्रित; किंग खानने स्वत: बनवला ‘हा’ पदार्थ

एका मुलाखतीदरम्यान आर माधवनला कंगनाच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आर माधवनने कंगनाचे कौतुक केलं आहे. आर माधवन म्हणाला, जर तुम्ही कंगनाच्या सर्व चित्रपटांच्या प्रमुख नायिका पाहिल्या तर त्या खूप मजबूत आहेत. तिला तिच्या स्वतःच्या घरात काही अतिशय मजबूत महिलांसोबत वाढण्याचे भाग्य लाभले. कंगना किंवा शालिनी किंवा मला ज्या महिलांसोबत काम करण्याचा बहुमान मिळाला त्या सर्व आपलं मत परखडपणे मांडणाऱ्या महिला होता.’

हेही वाचा- “माझा जीव घ्या, पण माझ्या भावाला..” सलमानसाठी राखी सावंत जीवावर उदार, लॉरेन्स बिश्नोईला दिले आव्हान, म्हणाली..

‘कंगना ही एक पुशओव्हर आणि स्टिरियोटाइप अभिनेत्री नाही. ती एक-दोन चित्रपटात येऊन नाचते आणि पुरुषाकडून मार खाऊन निघून जाते अशा प्रकारची ती नाही. कंगना एक अद्भुत अभिनेत्री आहे जी तिच्या पात्रासाठी खूप काही करते. ती चित्रपटाच्या पडद्यावर सर्व प्रकारची भूमिका साकारते आणि याचचं मला आश्चर्य वाटत असल्याचे आर माधवन म्हणाला.

हेही वाचा- Video : कतरिना कैफबद्दल प्रश्न विचारताच आलियाने फिरवलेलं तोंड; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर माधवनच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो नुकताच ‘रॉकेटरी’मध्ये दिसला होता. याशिवाय ‘अमेरिकन पंडित’, ‘टेस्ट’, सी शंकरन नायरचा बायोपिक हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. तर कंगना रणौत लवकरच ‘इमर्जन्सी’ नावाचा चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.