R Madhavn Talks About His Fear : आर माधवन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. करिअरच्या सुरुवातीलाच त्याने त्याच्या हटके स्टाईलने अनेकांची मनं जिंकली होती. त्याला त्याचे चाहते लाडाने मॅडी म्हणतात. आर माधवनने अभिनयाचा कोणताही वारसा नसताना इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
आर माधवनने फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर इतर भाषेतील चित्रपटांतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मणी रत्नम ते राजकुमार हिराणी यांसारख्या अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांबरोबर त्याने काम केलं आहे. पुढच्या वर्षी त्याला अभिनय क्षेत्रात ३० वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच त्याने प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला त्याला भीती वाटते असं सांगितलं आहे.
आर माधवनची प्रतिक्रिया
‘मिर्ची प्लस’सह संवाद साधताना त्याने याबद्दल सांगितलं आहे. आर माधवन म्हणाला, “आजकल मी सेटवर जातो तर मला खूप भीती वाटते. मला सेटवर पहिल्या दिवशी सगळे बघून, मॅडी संपला, आता याला अभिनय येत नाही. असं म्हणत असतील असं वाटतं. मला असं वाटतं की माझे असिस्टंट माझ्याकडे बघून बोलतात की, आता वेळ आली आहे, दुसऱ्या कोणाला तरी संधी देण्याची. याला काही येत नाही. माझी ही भीती प्रत्येक चित्रपटाच्या वेळी वाढत जाते.”
आर माधवनने पुढे अजय देवगणबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, “जेव्हा मी त्याच्याबरोबर शैतानमध्ये काम केलं. तेव्हा मला वाटलं की मी त्याला एकटंच सोडायला हवं, त्याला कदाचित फार बोलायला आवडत नाही. पण, एकदा त्याची ओळख झाली की तो खूप छान वाटतो, खूप गोष्टींबद्दल बोलतो, तो समजून घ्यायला थोडा वेळ घेतो. त्याच्यामध्ये एक निरागसता आहे. मला त्याचा खूप अभिमान वाटतो.”
माधवनने यापूर्वी चित्रपटांमधून ब्रेक घेण्याबद्दलही सांगितलेलं. त्याच्याकडे येणाऱ्या भूमिकांबरोबर तो कनेक्ट होत नसल्याने त्याला २-३ वर्षांचा ब्रेक घ्यायचा होता. याबद्दल तो म्हणालेला, “मला ब्रेक घ्यायचा होता, कारण मला माझ्या कामामुळे खूप विचित्र वाटत होतं. मी एका तामिळ गाण्यासाठी स्वीत्झर्लँड येथे शूटिंग करत होते त्यावेळी मी नारंगी रंगाची पँट आणि हिरव्या रंगाचं शर्ट घातलेलं आणि तेव्हा तेथील एक शेतकरी माझ्याकडे रागाने बघत होता आणि बडबड करत होता त्यावेळी मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, तू चेन्नईमध्ये ये मग कळेल तुला मी कोण आहे. मी खूप रागावलेलो, पण, मला नंतर जाणवलं की मी त्याला खूप महत्त्व देत आहे.”
आर माधवनला जरी कामामुळे भीती वाटत असली तरी यावर्षी मात्र त्याने अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याने ‘केसरी चॅप्टर २’मध्ये अक्षय कुमार आणि अनन्या पांडेबरोबर महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर त्याने ‘आप जैसा कोई’मध्येही मुख्य भूमिका साकारली आणि आता तो सध्या ‘दे दे प्यार दे २’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अजय देवगण, रकुल प्रीत सिंह आणि तो महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
