बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा अखेर लग्नबंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. लग्नानंतर परिणीती आणि राघव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

हेही वाचा- “तुमचं चोप्रा कुटुंबामध्ये स्वागत…”, परिणीती-राघवसाठी प्रियांका चोप्राची खास पोस्ट; म्हणाली…

दरम्यान लग्नामध्ये परिणीती आणि राघव खूप खूष दिसत होते. दोघांनी लग्नाच्या सगळ्या विधी एन्जॉय केल्या. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार मोजड्या लपवण्याच्या खेळात राघव यांनी परिणीतीच्या सगळ्या बहिणींना महागडी भेटवस्तू दिली आहे. राघव यांनी हा खेळ चांगलाच एन्जॉय केला. राघव यांनी त्यांच्या सर्व मेव्हणींना डायमंडचा नेकलेस भेट म्हणून दिला आहे.

हेही वाचा- Video: लग्नानंतर पहिल्यांदाच राघव चड्ढा व परिणीती चोप्रा आले माध्यमांसमोर, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली बरेच महिने परिणीती व राघवच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या. इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्रित पाहिलं गेलं. मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. अखेर मे महिन्यात दिल्लीमध्ये साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.