बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आप खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतंच त्यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. परिणीती व राघव यांच्या साखरपुडा समारंभाला बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक राजकीय मंडळींनीही हजेरी लावली होती. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

परिणीती व राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यानंतर आता संसदेतील एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत संसद स्पीकर वैंकय्या नायडू राघव चड्ढा यांना “प्रेम एकदाच होतं ना? दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा होत नाही. फक्त पहिलं प्रेम असतं,” असं विचारतात.

हेही वाचा>> अमोल कोल्हेंच्या नाटकाला सुप्रिया सुळेंची हजेरी, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “शिवपुत्र संभाजी…”

वैंकय्या नायडू यांनी असं विचारताच संसदेत एकच हशा पिकल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यांच्या या प्रश्नानंतर राघव चड्ढा लाजल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. “याबाबत मी अनुभवी नाही. जीवनात या गोष्टीचा अनुभव मी घेतलेला नाही. पण, ही चांगली गोष्ट असते,” असं ते म्हणाले. त्यावर पुन्हा नायडू “पहिलं प्रेमच चांगलं असतं,” असं म्हणत राघव चड्ढा यांची फिरकी घेताना दिसत आहेत. संसदेतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राघव चड्ढा व परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा १३मे रोजी पार पडला. साखरपुड्यासाठी परिणीतीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघवनेही त्याच रंगाचा सूट घालत ट्वीनिंग केलं होतं. साखरपुड्यानंतर आता परिणीती व राघवच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.