राज कपूर यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शो मॅन’ म्हटलं जातं. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी मोठं योगदान दिलं आहे. आज राज कपूर आपल्यात नसले तरीही त्यांच्याशी संबंधित गोष्टींची चर्चा नेहमीच होताना दिसते. राज कपूर यांच्याबाबत आता एक वृत्त समोर येत आहे. राज कपूर यांच्या आरके स्टुडिओनंतर आता त्यांचा चेंबूर स्थित बंगलाही विकला गेला आहे.

राज कपूर यांचा चेंबूर येथील हा बंगला खूप लोकप्रिय असून जवळपास १ एकरच्या परिसरामध्ये हा बंगला आणि आजूबाजूची प्रॉपर्टी पसरलेली आहे. ही बंगला आता विकला गेल्याचं बोललं जात आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी असल्याचं बोललं जात आहे. या आधी २०१९ मध्ये राज कपूर यांच्या आठवणींना महत्त्वाचा भाग मानला जाणारा आरके स्टुडिओ कपूर कुटुंबियांनी विकला होता.

आणखी वाचा- अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू; व्हिडीओ व्हायरल

राज कपूर यांचा हा चेंबूर येथील बंगला आता गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने विकत घेतल्याचं बोललं जातंय. कंपनी या ठिकाणी एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट बनवणार असल्याचीही चर्चा आहे. राज कपूर यांचा हा बंगला देवनार फार्म रोडवर टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायंसेसच्या बाजूला आहे. दरम्यान हा बंगला नेमका किती किंमतीला विकला गेलाय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार राज कपूर यांच्या कुटुंबियांकडून हा बंगला विकत घेतला गेला आहे.

आणखी वाचा- ‘मिर्झापूर’ फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान २०१९ मध्ये राज कपूर यांचा आरके स्टुडिओसुद्धा गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीनेच खरेदी केला होता. आरके स्टुडिओचा मालकी हक्क ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे होता. आरके स्टुडिओ ३३ हजार स्क्वेअर मीटर परिसरात पसरलेला आहे. १९४८ साली या स्टुडिओची स्थापना राज कपूर यांनी केली होती. होळी आणि गणेशोत्सवाला या ठिकाणी भव्य आयोजन होत असे. पण एकदा आग लागल्यानंतर या प्रॉपर्टीचा एक भाग जळला. ज्यानंतर कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता.