अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९ जुलै २०२१ रोजी त्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता लवकरच राज कुंद्रावर चित्रपट येणार आहे. ‘UT69’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे. राज कुंद्राने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली आहे.

हेही वाचा- “भारत को छेड़ोगे तो…” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून घेतलाय कंगना राणौतच्या ‘तेजस’चा डायलॉग; अभिनेत्री म्हणाली…

या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका राज कुंद्राच साकारणार आहे. राजने याबाबतचा एक व्हिडीओही आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत राज कुंद्राबरोबर फराह खान आणि मुनव्वर फारूकी दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत राजने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट ३ नोव्हेबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या अनेक दिवसांपासून राज कुंद्रावर बायोपिक येणार असल्याची चर्चा रंगली होती. या बायोपिकमधून राजने तुरुंगात घालवलेल्या दिवसांवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून राज कुंद्राची बाजू जनतेसमोर येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. वादात सापडल्यानंतर त्याचे काय झाले हे या चित्रपटात दाखवले जाईल. या चित्रपटात राज कुंद्राचे आर्थर रोड जेलमधील अनुभव दाखवले जाणार आहेत.