बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची आज ८०वी जयंती आहे. ‘आखिरी खत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या राजेश खन्ना यांनी एक-दोन नव्हे तर सलग तब्बल १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. त्यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच खासगी आयुष्यबाबतही बरीच चर्चा रंगली होती.

राजेश खन्ना यांनी वयाने १५ वर्षांनी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी १९७३ साली लग्नगाठ बांधली. त्यांना ट्विंकल व रिंकु खन्ना या दोन मुली आहेत. परंतु राजेश खन्ना यांनी त्यांची दुसरी लेक रिंकुच्या जन्मावेळी तिचा चेहरा पाहिला नव्हता. खुद्द डिंपल कपाडिया यांनीच एका मुलाखतीदरम्यान याचा किस्सा सांगितला होता.

हेही वाचा>>‘पावनखिंड’ फेम अभिनेत्याने शेअर केला रायगडावरील फोटो, म्हणाला “सांगा सरकार…”

“राजेश खन्ना यांनी धाकट्या लेकीच्या जन्मानंतर सहा महिने तिचा चेहराही पाहिला नव्हता. त्यांना त्यावेळी मुलगा हवा होता. मुलगी झाल्यामुळे ते नाराज होते. म्हणून त्यांनी जन्मानंतर रिंकु खन्नाचा चेहरा पाहिला नव्हता. परंतु, नंतर त्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्याची जाणीव झाली”, असा खुलासा डिंपल कपाडिया यांनी मुलाखतीत केला होता.

हेही वाचा>>“तुनिषा शर्माचा खून…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा उल्लेख करत बॉलिवूड अभिनेत्रीचं ट्वीट

राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची मोठी मुलगी ट्विंकल खन्नाने बॉलिवूडमध्ये काही काळ काम केलं. नंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. ट्विंकल एक लेखिकाही आहे. वडिलांच्या जन्मदिनीच ट्विंकल खन्नाचाही वाढदिवस असतो.

हेही वाचा>>“अशोक सराफ आजही…”, निवेदिता यांनी पतीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंकु खन्ना ही राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची धाकटी लेक. रिंकुनेही बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहिलं होतं. चमेली, जिस देश में गंगा रहता है, मुझे कुछ कहना है या चित्रपटात तिने काम केलं आहे. परंतु, बॉलिवूडमध्ये तिला काही खास कामगिरी करता आली नाही. रिंकु २००३ मध्ये व्यावसायिक समीर सरनशी विवाहबद्ध झाली. त्यांना दोन मुले आहेत. सध्या ती लंडनमध्ये स्थायिक आहे.