राखी सावंत व आदिल खान दुर्रानी यांच्यामधील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आदिलला अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. आता दिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राखी सतत आदिलवर गंभीर आरोप करत आहे. आता तिने आणखी एक खुलासा केला आहे.

आणखी वाचा – आदिल खानला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राखी सावंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “मला आनंद…”

राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप

‘ईटाइम्स’शी संवाद साधताना राखीने सांगितलं की, “मी अजूनही आदिलवर प्रेम करते. यापुढेही त्याच्यावर मी प्रेम करत राहणार. पण त्याने माझा विश्वासघात केला आहे. तो मला मारहाण करायचा. मला अभिनेता बनव असं सतत म्हणायचा. मी मोठा व्यावसायिक आहे तसेच बऱ्याच वस्तू मी राखीला दिल्या आहेत असं तो सगळ्यांना सांगायचा. जर माझं म्हणणं तू ऐकलं नाही तर मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही. तुझ्याशी नीट वागणार नाही असं आदिल सतत म्हणायचा.”

आदिल खानने राखी सावंतला दिली होती धमकी

पुढे ती म्हणाली, “माझ्या विरोधात जर तू काही बोललीस तर ५० हजार देऊन मी तुला ट्रकने उडवेन. माझं आयुष्यच उद्धवस्त झालं आहे. माझ्या आईचं निधन झालं. त्यानंतर माझं लग्नही मोडलं.” राखी सातत्याने आदिलवर आरोप करत आहे. शिवाय तिने आदिलच्या पहिल्या पत्नीबाबतही भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिल खानच्या पहिल्या पत्नीचा राखी सावंतला फोन

“आदिलच्या पहिल्या पत्नीचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मला अधिक धक्का बसला. मला त्याच्या पहिल्या पत्नीने फोन करुन सांगितलं की, मी एक हिंदू मुलगी आहे. माझ्याशी लग्न करायचं म्हणून आदिलने मला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली.” असं राखीने या मुलाखतीमध्ये सांगितलं. तर दुसरीकडे राखी करत असलेले आरोप खोटे असल्याचं आदिलचे वकील म्हणत आहेत.