अभिनेत्री राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (२८ जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास राखीची आई जया यांचं निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. रुग्णालयामध्ये जया यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. दरम्यान राखीच्या आईचं जेव्हा निधन झालं तेव्हा नेमकं काय घडलं याबाबत आता माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, असा ड्रेस परिधान करत स्वतःच म्हणाली, “तो कोण आहे ज्याने…”

राखी सावंतचा भाऊ काय म्हणाला?

राखी तिच्या आईबरोबर अगदी शेवटपर्यंत होती. त्याचबरोबरीने राखीच भाऊही या कठीण प्रसंगांमध्ये तिच्याबरोबर होता. राखीचा भाऊ राकेश सावंतलाही आईच्या निधनानंतर दुःख अनावर झालं. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राकेशने त्याच्या आईचं जेव्हा निधन झालं तेव्हा नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.

राकेश म्हणाला, “आजारामुळे माझी आई खूप त्रस्त होती. तिच्या किडनी, फुफ्फुसांपर्यंत कर्करोग पसरला होता. यामुळे शरीराचे इतर अवयवही निकामी झाले होते. ज्या दिवशी आईचं निधन झालं त्याच रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला. राखी व मला आईचं दुःख बघवत नव्हतं.”

आणखी वाचा – “तिला नेहमी वाटायचं की…” आईच्या निधनानंतर राखी सावंतचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय राकेशने यावेळी सलमान खानचेही आभार मानले. राखीच्या आईच्या निधनानंतर सलमानने तिला फोन केला होता. शिवाय तिच्या आईच्या उपचारासाठी सलमानने आर्थिक मदतही केली. आईच्या निधनानंतर राखी पूर्णपणे कोलमडून गेली आहे. तिचे रडतानाचे बरेच व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.