राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या संसारात वादळ निर्माण झालं आहे. राखीशी लग्न केल्यानंतर तिचा पती आदिल खान दुसऱ्या एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, तो राखीला मारहाणही करायचा अशी राखीने तक्रार केली होती. राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशाविरा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर आदिल आता १४ दिवस न्यायालयीन कोठडीत असणार आहे.

राखीने आदिल विरुद्ध तक्रार केल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल तसंच आदिलबद्दल राखी नवनवीन खुलासे करत आहे. दोन दिवसापूर्वीच राखी सावंतच्या भावाने आदिलने राखीला मारहाण केल्यानंतरच्या तिच्या शरीरावरील जखमांचा फोटो आऊट केला होता. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता राखीने तिला आई व्हायचं होतं परंतु आदिलने तसं होऊ दिलं नाही असं म्हटलं आहे.

हेही वाचा : राखी सावंतचा संसार वाचवण्यासाठी सलमान खानने केली मध्यस्थी, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्याने आदिलला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात राखी म्हणाली, “मला आई व्हायचं होतं, मला एक चांगली पत्नी व्हायचं होतं. पण आदिलने माझा वापर करून घेतला. माझ्या भावनांशी खेळला आहे. खोटं खोटं आय लव यू म्हणत त्याने माझं आयुष्य खराब केलं आहे. आपण बाळाचा विचार करूया असा तो नेहमी म्हणायचा. पण पैसे दिले नाहीत, त्याला स्टार नाही बनवलं किंवा त्याला एका मोठ्या अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये घेऊन गेले नाही तर… फरहान खानशी भेट करून दे, शाहरुख खानला भेटव, सलमान खानला भेटाव, मुकेश छाब्राशी ओळख करून दे नाहीतर मी बाळ होऊ देणार नाही असं तो म्हणायचा.”

आणखी वाचा : राखी सावंतला दुसऱ्याबरोबर रोमान्स करताना पाहून भडकला आदिल खान, प्रकरण गेले मारामारीपर्यंत

दरम्यान राखी सावंत आणि आदिल खान यांनी मे २०२२ मध्ये लग्न केलं होतं. गेल्या महिन्यातच राखीने आदिलशी लग्न केल्याचे जाहीर केलं होतं. तर आता राखीने आदिलपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.