बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती आदिल खानचं अफेअर असल्याचं उघड केल्यानंतर राखीने त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर ओशिवारा पोलिसांकडून आदिलला ७ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.

आदिलच्या अटकेनंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. त्यानंतर राखीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक दिवसांच्या ड्रामानंतर राखी आता शूटिंगमध्ये व्यग्र झाली आहे. राखीचं नवं गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीचा शूटिंग सेटवरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी तिच्या नव्या गाण्याबाबत माहिती देत आहे. “जीना यहाँ मरना यहाँ, फिल्म इंडस्ट्री के सिवा जाना कहाँ”, असं राखी म्हणत आहे.

हेही वाचा>> Video: “मी कायमच त्याला पती मानलं, पण…” नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी कॅमेऱ्यासमोरच रडली, म्हणाली “पैशाने तू…”

राखीने व्हिडीओमध्ये डिझायनर ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केल्याचं दिसत आहे. “कोर्ट कचेरी खूप झालं. नकारात्मक गोष्टी माझ्या आयुष्यातून निघून गेल्या आहेत. आता मी शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमान खानच्या स्पेशल कोरिओग्राफरकडून हे गाणं कोरिओग्राफ होणार आहे. या गाण्यावर ७०-८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. माझ्या आयुष्यातील हे सगळ्यात मोठं गाणं आहे”, असं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> ‘साडी के फॉल सा’ गाण्यावर सोनाक्षी सिन्हासह विराट कोहलीने केलेला भन्नाट डान्स, ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिलला अटक झाल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला त्याची रवानगी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. २० फेब्रुवारीला आदिलला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आदिलवर म्हैसूरमध्ये इराणी महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आदिलची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.