अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या दोघांचं कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. हळदी, मेहंदी, संगीत, सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्नसोहळा रकुल व जॅकीचा असणार आहे. २१ फेब्रुवारीला गोव्यात जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाआधी रकुल व जॅकीचं देवदर्शन सुरू झालं आहे. नुकतंच दोघांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेरील व्हिडीओ ‘फिल्मी ग्यान’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी रकुलने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर जॅकी कुर्ता व पँटमध्ये पाहायला मिळाला. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर रकुल व जॅकी पापाराझींना पोझ देताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! अंकुश चौधरीचा नवा रिअ‍ॅलिटी शो येणार भेटीस, पहिला प्रोमो आला समोर

१९ फेब्रुवारी रकुल व जॅकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. हळदी, मेहंदी आणि संगीत हे समारंभ १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. मुंबई गोवा या दोन्ही ठिकाणी समारंभ होणार आहेत. १५ फेब्रुवारीला रकुल व जॅकीची ढोल नाइट समारंभ पार पडला. यावेळी जॅकीच्या घरी हिरव्या रंगाचा शरारा घालून अभिनेत्री गेली होती.

हेही वाचा – Premachi Goshta: “चांदीच्या ताटात म्हावऱ्याचं तुकडं…”, मुक्ताने सागरसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रकुल व जॅकी लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते आणि दोघं एकमेकांचे शेजारी होते. पण तरीही दोघांमध्ये कधीच जास्त बोलणं झालं नव्हतं. दोघांची पहिली भेट लॉकडाऊनच्या वेळी झाली होती. ३ ते ४ महिने दोघांची चांगली मैत्री होती. त्यानंतर दोघं रिलेशनशिपमध्ये आले. आता ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकत आहेत.