बॉलीवूडमधील अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा २१ फेब्रुवारी रोजी गोव्यात पार पडला. गोव्यातील आयटीसी ग्रुपच्या फाइव्ह स्टार रिसॉर्टमध्ये या दोघांचे लग्न झाले. या लग्नासाठी दोघेही स्पेशल लूकमध्ये दिसले.

अनुष्का शर्मा व कियारा अडवाणीप्रमाणेच रकुल प्रीत सिंगनेही पेस्टल लेहेंग्याची निवड केली होती. परंतु, या नववधूने बॉलीवू़डमधील लोकप्रिय डिझायनर्स मनीष मल्होत्रा, सब्यसाची यापैकी कुणाचीही निवड न करता, तरुण तहिलियानी या डिझायनरची निवड केली. तरुण तहिलियानी हे भारतीय फॅशनच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर रकुल आणि जॅकीच्या लग्नातील पोशाखांच्या डिझाइन्सचे विश्लेषण थोडक्यात शेअर केले आहे.

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
Do not want to think what doctor said Shreyas Iyer
Shreyas Iyer : केंद्रीय करार आणि दुखापतीवर श्रेयसने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘जर तुम्ही भूतकाळ किंवा भविष्यावर…’

हेही वाचा… ट्विंकल खन्नाच्या ‘त्या’ विधानावर कंगना रणौतचे खडेबोल; म्हणाली, “पुरुषांना प्लास्टिकची बॅग…”

रकुल प्रीत सिंगला लग्नासाठी आधुनिक आणि मॉडर्न लूक हवा होता. डिझायनरने निळसर गुलाबी रंगाच्या शेड्समध्ये थ्रीडी फुलांची आकृती असलेला लेहेंगा बनविला. पत्नी रकुल प्रीत सिंग आणि पती जॅकी भगनानी या दोघांची स्टाईल अमी पटेलने केली होती. रकुलने लग्नासाठी ड्युई मेकअपसह ग्लॉसी न्यूड पिंक लिप्सची निवड केली होती.

तसेच जॅकी भगनानीच्या शेरवानीमध्ये उत्तम कलाकुसर असल्याची खात्री तरुण तहिलियानी यांनी केली. चिनार पानाच्या नक्षीचा वापर करीत संपूर्ण पोशाख बनविला गेला होता. वरानेही जड कुंदनचा हार घातला होता. सध्या पेस्टल पोशाखांचा ट्रेंड सुरू आहे आणि लग्नसोहळ्यासाठी सेलिब्रिटी पेस्टल रंगाची निवड करताना दिसत आहेत.

या जोडप्याने सुरुवातीला बाहेरगावी डेस्टिनेशन वेडिंग करण्याची योजना आखली होती; परंतु भारतात पर्यटनाला चालना दिली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्यानंतर रकुल आणि जॅकीने गोव्याची निवड केली. या लग्नसोहळ्याला अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, वरुण धवन, नताशा दलाल, भूमी पेडणेकर, शाहिद कपूर, मीरा राजपूत आदी कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा… आलिया भट्ट लेक राहासाठी रोज लिहिते ई-मेल; रणबीर कपूरने केला खुलासा, म्हणाला…

दरम्यान, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीबद्दल सांगायचे झाले, तर रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांची खूप वर्षांपासून मैत्री होती. ते दोघे एकमेकांना चार वर्षांपासून डेट करीत आहेत. या जोडप्याने त्यांचे नाते लपवलेले नाही; परंतु त्याची चर्चाही त्यांनी केली नाही.