अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. दोघांचे व्हिडीओ, फोटो हे सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. दोघांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याची नेहमी चर्चा रंगलेली असते. सध्या आलिया-रणबीर वांद्रे येथील नव्या आलिशान घरामुळे चर्चेत आले आहेत. या नव्या घराचं बांधकाम सुरू असून नुकतंच दोघींनी त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर देखील होत्या.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर आलिया-रणबीरचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दोघं नीतू कपूर यांच्यासह नव्या घराच्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहेत. माहितीनुसार, आलिया-रणबीरने वांद्र्यातील या १५ मजल्याच्या इमारतीमध्ये पाच मजले कपूर कुटुंबासाठी बूक केले आहेत. या नव्या घराला पूर्ण होण्यासाठी सहा वर्ष लागणार असून त्यापूर्वी पाच अपार्टमेंट बनवले जाणार आहेत. या इमारतीमधील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंट जवळपास तयार झाले आहेत. लवकरच आलिया-रणबीर शिफ्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – Video: फुलांचा वर्षाव, भन्नाट उखाणा अन्…, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितीक्षा तावडेचा सासरी ‘असा’ झाला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

‘बॉलीवूड लाइफ’च्या वृत्तानुसार, आलिया-रणबीरच्या या नव्या घराची किंमत २५० कोटींहून अधिक आहे. हे आलिशान घर आलिया-रणबीर लेक राहाच्या नावावर करणार आहेत.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीला आशुतोषची येतेय आठवण, मधुराणी प्रभुलकर पोस्ट करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलिया-रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच आलिया ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तसेच रणबीर शेवटचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासह दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच लवकरच आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये झळकणार आहे.