रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलीवूड मधील एक अत्यंत लोकप्रिय जोडपं आहे. ते नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस झाला. लग्नाच्या या वाढदिवसानिमित्त रणबीरने आलियाला एक मोठी भेट दिल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

रणबीर आणि आलिया त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे तिथे गेले होते. या दरम्यानचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात ते पापाराझींना पोज देताना दिसले, तर आलियाने रणबीरला सर्वांसमोर किसही केलं. तिने रणबीरला केलेल्या या किसची सर्वत्र खूप चर्चा रंगली. तर याच बरोबर लक्ष वेधून घेतलं ते आलियाच्या हातात असलेल्या बॅगने.

आणखी वाचा : मुलीच्या जन्मानंतर ‘अशी’ झाली आहे आलियाची अवस्था; फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त परदेशात शूटिंग करत असलेला रणबीर मुंबईला आला. एअरपोर्टवर त्याला पापाराझींनी स्पॉट केलं. हा त्याचा एअरपोर्ट व्हिडीओ खूप व्हायरल झाला. यात त्याच्या हातात गुलाबी रंगाची एक स्लिंग बॅग दिसत आहे. रणबीरने आलियासाठी लंडनहून ही बॅग खरेदी केली होती. तर त्यादिवशी त्यांच्या नवीन घराचं बांधकाम पाहायला गेलेल्या आलियाच्या हातामध्ये ही तीच बॅग दिसली.

हेही वाचा : “चित्रपट माझं पहिलं प्रेम पण…” राहाच्या जन्मानंतर आलिया भट्टने करिअरबाबत घेतला मोठा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लगेचच चाहत्यांनी या गिफ्टच्या किंमतीचा अंदाज लावला. ही छोटीशी बॅग तब्बल १० लाख रुपयांची आहे असं बोललं जात आहे. परंतु अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.