scorecardresearch

Premium

“आम्ही कधीच मित्र बनू शकलो नाही” वडील ऋषी कपूर यांच्याबाबत रणबीरचे विधान चर्चेत, म्हणाला…

रणबीरने वडील ऋषी कपूर यांच्याबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

ranbir kapoor and rushi kapoor
डील ऋषी कपूर यांच्याबाबत रणबीरचे विधान चर्चेत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच त्याचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये प्रेक्षकांना रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. प्रेक्षकांकडून या टीझरला भरघोस प्रतिसाद मिळला आहे. सध्या रणबीर अ‍ॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारे चित्रपटाचे कथानक आहे. दरम्यान एका कार्यक्रमात रणबीरने त्याचे वडील ऋषी कपूर यांच्याबरोबर कसं नात होत याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा- “आमच्या पिढीला सेक्सची…” मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “पतीला खुश…”

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
PM Narendra Modi
“फोडाफोडी करुन भाजपाला २०० जागाही मिळणार नाहीत”, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा
What Uddhav Thackeray Said?
“अशोक चव्हाण लीडर नव्हे डीलर म्हणणाऱ्या फडणवीसांनी आता त्यांच्याशी डील..”, उद्धव ठाकरेंची टीका

नुकतचं अ‍ॅनिमल चित्रपटाच्या स्टारकास्टने हैद्राबादमध्ये प्रमोशन सोहळ्यात हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये रणबीरने त्याचे दिवंगत वडील ऋषी कपूर यांच्याबरोबरच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. रणबीर म्हणाला, जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा माझे वडील पूर्ण दिवस शूटिंगमध्ये व्यस्त असायचे. मला त्यांच्या कामाबद्दल आदर आहे पण मी कधीच त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवू शकलो नाही. आमच्या दोघांमध्ये कधीच मैत्री झाली नाही. आम्ही कधीच एकमेकांबरोबर बसून गप्पा मारल्या नाहीत. याचा मला नेहमीच पश्चाताप वाटतो. कॅन्सरच्या आजाराने २०२० साली ऋषी यांचे निधन झाले. अमेरिकेमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर १ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर, रश्मिकाबरोबर बॉबी देओल, अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. हिंदीबरोबर हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. तसेच दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoor says he did not had friendly relation with rishi kapoor dpj

First published on: 28-11-2023 at 19:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×