Premium

रणबीर कपूर ‘आदिपुरुष’ सिनेमाची १० हजार तिकिटे खरेदी करणार, कारण…

Adipurush : ‘आदिपुरुष’ सिनेमाची १० हजार तिकिटे रणबीर कपूर खरेदी करणार आहे.

ranbir-kapoor-adipurush
'आदिपुरुष' चित्रपट येत्या १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. काही दिवासांपूर्वीच ‘आदिपुरुष’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तिकिटे फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता रणबीर कपूरही ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तिकिटे मोफत वाटणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रणबीर कपूर ‘आदिपुरुष’ सिनेमाची १० हजार तिकिटे खरेदी करणार असल्याचं म्हटलं आहे. रणबीर कपूर वंचित समाजातील छोट्या मुलांसाठी ही तिकिटे खरेदी करणार आहे.

हेही वाचा>> अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा आरोप

‘आदिपुरुष’ चित्रपट येत्या १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे. तर क्रिती सेनॉन सीता मातेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoor to book 10000 tickets of adipurush movie om raut prabhas kak

First published on: 09-06-2023 at 13:17 IST
Next Story
लांब जटा, अंगाला भस्म अन् गळ्यात रुद्राक्षांची माळ; पोस्टरमधील ‘या’ अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?