भूमिकेशी अगदी समरस होऊन काम करणाऱ्या काही मोजक्या मेहनती अभिनेत्यांच्या यादीत रणदीप हुड्डा हे नाव हमखास येतंच. आजवर रणदीपने विविध भूमिका साकारल्या आहेत. पण सध्या मात्र तो त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. सर्वप्रथम हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. काही कारणास्तव महेश मांजरेकर यांनी यातून काढता पाय घेतला अन् दिग्दर्शनाची धुरा रणदीपने स्वतःच्या खांद्यावर पेलली.

गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीझर लोकांसमोर आला. तेव्हापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. सध्या रणदीप हुड्डा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर रणदीप मुलाखतीमध्ये त्याच्या या चित्रपटावर काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य करत आहे. नुकतंच रणदीपने ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’वर हजेरी लावली अन् याविषयी विस्तृतपणे भाष्य केलं. याच मुलाखतीदरम्यान रणदीपला हा चित्रपट का केला याबद्दल विचारण्यात आलं. तसेच सध्या सत्तेत असलेल्या सरकाराच्या पाठिंब्यामुळे अशा प्रकारच्या विचारधारेचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत असा कयास बऱ्याच लोकांनी लावला, त्याविषयीही रणदीपला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं.

Pa Ranjith challenge to Tamil Nadu parties over BSP leader killing
“आम्ही तुम्हाला का घाबरायचं?”; बसपाच्या नेत्याच्या हत्येनंतर दिग्दर्शक पा रंजीत काढलेल्या मोर्चामुळे राजकारण तापले
Actor Ritesh Deshmukh believes that the amount of OTT is to some extent on the stress of financial success
आर्थिक यशाच्या ताणावर ‘ओटीटी’ची मात्रा काही प्रमाणात लागू; अभिनेता रितेश देशमुखचे मत
Loksatta Documentary Discovery channel David Attenborough Director
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘पाहण्या’च्या पर्यायांत दिशादर्शक…
exclusive interview with bai ga movie team in Loksatta Digital Adda
स्त्री इच्छांच्या सन्मानाची गोष्ट
Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
Thane, Police Officer Suspended for Issuing Fake Filming Permits, Issuing Fake Filming Permits in thane, thane news,
ठाण्यात मालिकांच्या चित्रीकरण बनावट परवानगीचे पत्र, पत्रावर पोलीस उपायुक्ताची बनावट स्वाक्षरी
actor nawazuddin siddiqui share opinion on big budget movie with loksatta representative mumbai
एवढा अवाढव्य निर्मितीखर्च कशासाठी? – नवाझुद्दीन सिद्दीकी
Ranveer Singh
कल्की चित्रपट पाहिल्यानंतर रणवीर सिंह पत्नी दीपिकाच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “त्या प्रत्येक क्षणाला…”

आणखी वाचा : “सहा कोटींची कार घेतली अन् आता सायकल का चालवतोस?”, चाहत्याच्या खोचक टिप्पणीवर कार्तिक आर्यनचं उत्तर

त्यावर उत्तर देताना रणदीप म्हणाला, “कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है केहना. हा चित्रपट करण्यामागील वास्तव मला ठाऊक आहे. हा चित्रपट मी सावरकरांवर झालेला अन्याय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवला आहे. यामध्ये माझी कुणीही मदत केलेली नाही. मी माझं घर दार विकून हा चित्रपट केला आहे. तुम्ही कोणत्या प्रोपगंडाबद्दल बोलत आहात? कोण ३० कीलो वजन कमी करून दीड वर्षाहून अधिक एका प्रोपगंडा चित्रपटासाठी मेहनत घेतं? मला माहितीये मी हा चित्रपट का बनवला आहे, त्यामुळे लोकांना याबद्दल काय वाटतं याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाही.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर उत्कर्ष नैथानी व रणदीप यांनी मिळून याचे संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत आहेत. ट्रेलर पाहूनच हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई करेल अशी शक्यताही कॉमेंटच्या माध्यमातून नेटकरी वर्तवत आहेत.