बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या ‘स्वातंत्र्य वीर सावकर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. २०१६ मध्ये रणदीपने ऐश्वर्या रॉयबरोबर ‘सरबजीत’ चित्रपटामध्ये काम केलं आहे. यामध्ये ऐश्वर्याने रणदीपच्या बहिणीची भूमिका साकारली होती. नुकत्याच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या आहेत.

‘सरबजीत’ हा चित्रपट सरबजीत सिंहच्या जीवनावर आधारित बायोपिक होता. सरबजीतला दहशतवादी आणि गुप्तहेर ठरवून पाकिस्तानने त्याचा खूप छळ केला. आपल्या भावाला सोडवण्यासाठी त्याची बहीण दलबीर कौर यांनी दीर्घ लढा दिला आणि सरकारकडे मदत मागितली. असं या चित्रपटाचं कथानक होतं.

हेही वाचा : सात वर्षांच्या प्रयत्नानंतर गरोदर होती राणी मुखर्जी, पण झाला गर्भपात; खंत व्यक्त करत म्हणाली, “मी माझ्या मुलीला…”

रणदीपला या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या रायबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. तिच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल रणदीप सांगतो, “ती अतिशय छान आणि विनम्र आहे. ऐश्वर्या तिचं सगळं काम अतिशय व्यवस्थित लक्षपूर्वक करते. आमचं सेटवर जास्त बोलणं झालं नाही. कारण, तिचे सीन्स वेगळे होते आणि माझे वेगळे…पण, जेव्हा आम्ही एकत्र सीन्स केले तेव्हा तिने उत्तमप्रकारे काम केलं.”

“ऐश्वर्या स्क्रीनवर भूमिकेनुसार साधी दिसावी यासाठी मेकर्सनी खूप प्रयत्न केले पण, ती तशी दिसत नव्हती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझं ऐश्वर्यापेक्षा सरबजीतच्या खऱ्या बहिणीशी खूप चांगलं बॉण्डिंग झालं होतं. त्या आता आपल्यात नाहीत. त्यांच्याबरोबर आणखी काही वेळ घालवता आला असता तर मला फार आवडलं असतं. त्यांनी सरबजीत यांच्या मुलांची मनापासून काळजी घेतली. त्या सगळ्यांच्या मी संपर्कात असतो आणि त्या चित्रपटाचा माझ्या वैयक्तिक जीवनावर खूप प्रभाव पडला.” असं रणदीप हुड्डाने सांगितलं.

हेही वाचा : नातीच्या हातचा पास्ता खाऊन जया बच्चन यांच्या डोळ्यात आलेलं पाणी; नव्या नंदा म्हणाली, “मी खूप जास्त मसाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणदीपच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, रणदीप हुड्डाने दिग्दर्शित केलेला व तो प्रमुख भूमिकेत असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी त्याने तब्बल २६ किलो वजन कमी केलं होतं.