रणदीप हुड्डा बॉलीवूडमधील बहुअयामी अभिनेत्यांपैकी एक आहे. रणदीप त्याच्या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेशी समरस होऊन काम करतो. आत्तापर्यंत त्याने अनेक भूमिका साकाल्या आहे. लवकरच त्याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरनंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुक्ता वाढली आहे.

रणदीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने वीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त अंदमानमधील सेल्युलर जेलला भेट दिली होती. या जेलमधील वीर सावरकरांच्या खोलीतही त्याने काही वेळ घालवला. याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होता. दरम्यान त्याचा नवा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

Swatantra Veer Savarkar box office Collection Day 6
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने सहाव्या दिवशी कमावले ८६ लाख रुपये, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
Swatantra Veer Savarkar box office Collection Day
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं पाच दिवसांचं कलेक्शन १० कोटींहून कमी, जाणून घ्या एकूण आकडेवारी
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Swatantra Veer Savarkar box office Collection Day 3
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या कमाईत तिसऱ्या दिवशी थोडी वाढ; रणदीप हुड्डाच्या सिनेमाचं एकूण कलेक्शन फक्त…

हेही वाचा- “हिंमत असेल तर…” ट्रोल करणाऱ्यांवर जया बच्चन भडकल्या, म्हणाल्या…

रणदीपच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर झळकला आहे. रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही महिती दिली. टाईम्स स्क्वेअर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडीओ झळकताच तिथे उपस्थित असणारे भारतीय जल्लोष करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट येत्या २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीपने अभिनय करण्याबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अंकिता लोखंडे, अमिंदरदीप सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.