अभिनेत्री राणी मुखर्जीचा आज २१ मार्च रोजी ४५ वा वाढदिवस आहे. राणी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने २०१४ साली यशराज टेलिफिल्म्सचा सर्वेसर्वा निर्माता आदित्य चोप्राशी लग्नगाठ बांधली. आदित्यचं हे दुसरं लग्न होतं. आज राणीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात.

पहिलाच चित्रपट अन् सुबोध भावेबरोबर पहिलाच रोमँटिक सीन; शूटिंगचा अनुभव सांगत प्रियदर्शिनी म्हणाली, “मला सेटवर गेल्यावर…”

राणी मुखर्जीने नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ विथ वोग’ या चॅट शोमध्ये खुलासा केला होता की तिची आणि आदित्य चोप्रा यांची पहिली भेट ‘मुझसे दोस्ती करोगे’च्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची मैत्री इतकी वाढली होती की, ‘वीर जारा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राणी मुखर्जी आदित्य चोप्रासाठी तिच्या घरून जेवण घेऊन जायची.

“कौटुंबिक दबावामुळे त्याने…” धमकीचा मेल अन् सुरक्षा वाढवल्याबद्दल सलमान खानची प्रतिक्रिया काय? मित्राने दिली माहिती

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राच्या जवळीकीच्या चर्चांमुळे आदित्यचे पालक यश चोप्रा आणि पामेला चोप्रा अस्वस्थ झाले होते. त्याचं कारण म्हणजे आदित्य विवाहीत होता. राणीबरोबरचं नातं पुढे नेण्यासाठी आदित्य चोप्राला पत्नी पायल खन्नाला घटस्फोट देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र, पत्नीला घटस्फोट देणं आदित्यसाठी सोपं नव्हतं. घटस्फोटानंतर आदित्य चोप्राला पायल खन्नाला पोटगी म्हणून ५० कोटी रुपये द्यावे लागले होते, असं म्हटलं जातं. घटस्फोटाचं हे प्रकरण जवळपास दोन वर्षे चाललं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्राने राणी मुखर्जीच्या आई-वडिलांची भेट घेऊन तिला डेट करण्याची परवानगी मागितली होती. आदित्यने पायल खन्नाला घटस्फोट देऊन राणी मुखर्जीशी २०१४ मध्ये लग्न केलं. या दोघांना आदिरा नावाची मुलगी आहे.