९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीला ओळखलं जातं. आजवर तिने ‘कुछ कुछ होता हैं, ‘चलते चलते’, ‘कभी अलविदा ना कहेना’, ‘मर्दानी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सिनेसृष्टीत यश मिळवल्यावर वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने निर्माता-दिग्दर्शक तसेच यशराज फिल्म्सचा प्रमुख असलेल्या आदित्य चोप्राशी लग्न केलं. राणीने २०१५ मध्ये लेक आदिराला जन्म दिला.

राणीने लेकीच्या जन्मानंतर पुढे काही वर्षांत पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. परंतु, तिने आदिराला कधीच फारसं माध्यमांसमोर आणलं नाही. अनंत अंबानींच्या जामनगरमध्ये पार पडलेल्या प्री-वेडिंग सोहळ्याला अभिनेत्रीने नुकतीच लेकीसह उपस्थिती लावली होती. याच सोहळ्यात चाहत्यांना राणीच्या लेकीची झलक अनेक वर्षांनंतर पाहायला मिळाली.

हेही वाचा : ठरलं तर मग : “सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुभेदारांना समजलं तर?” नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर जुई गडकरी म्हणाली…

प्री-वेडिंग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी राणीने तिची ८ वर्षांची लेक आदिरा आणि सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घालून दिली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी रजनीकांत यांनी देखील आदिराची प्रेमाने विचारपूस केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. राणीने या कार्यक्रमासाठी सोनेरी रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, आदिराने देखील यावेळी सुंदर असा लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

हेही वाचा : Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पोहोचली ऑस्ट्रेलियात! प्राजक्ता माळीसह समुद्रकिनारी थिरकले विनोदवीर, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या राणीची लेक रजनीकांत यांची भेट घेतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. यावर असंख्य नेटकऱ्यांनी “ही एकदम राणीसारखी दिसते”, “खूपच सुंदर व्हिडीओ” अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, राणीने काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी “एवढी वर्षे आदिराचे फोटो कोणत्याही पापाराझींनी काढले नाहीत यासाठी मी सर्वांचे आभार मानते. मी आणि आदीने ( आदित्य चोप्रा ) हा मिळून घेतलेला निर्णय होता. तिला सामान्य मुलांप्रमाणे जीवन जगता यावं यासाठी आम्ही विशेष काळजी घेतली होती.” असं राणी मुखर्जीने सांगितलं होतं.