स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या वर्षभरापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. सायली, अर्जुन, प्रिया, कल्पना, साक्षी, पूर्णा आजी या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये सायलीची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत लोकप्रिय आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी अभिनेत्रीला मालिकेसंदर्भातील अनेक प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत जुईने मालिकेच्या आगामी ट्रॅकविषयी प्रेक्षकांना थोडीफार हिंट दिली आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या एकीकडे अर्जुनचे वडील प्रताप सुभेदार यांना अटक झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. तर, दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्यच्या अनेक वर्षांच्या मैत्रीत साक्षीमुळे दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात जुईला “चैतन्यला त्याची चूक केव्हा समजणार?” “महिमत आणि साक्षीला अटक केव्हा होणार?” आणि “सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुभेदार मान्य करतील का?” असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्या प्रश्नांची अभिनेत्रीने उत्तरं दिली आहेत.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

हेही वाचा : Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पोहोचली ऑस्ट्रेलियात! प्राजक्ता माळीसह समुद्रकिनारी थिरकले विनोदवीर, व्हिडीओ व्हायरल

जुई गडकरी या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देत लिहिते, “मालिकेत लवकरच तुम्हाला अशाप्रकारचा ट्रॅक पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही आगामी एपिसोड नक्की एपिसोड बघा. खूप गोष्टींवर सध्या काम सुरू आहे. यापेक्षा जास्तीचं मी काहीही सांगू शकत नाही.”

हेही वाचा : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत वर्णी लागल्यानंतर सुमीत पुसावळेचं कुटुंबीयांसह सेलिब्रेशन, बायकोने शेअर केली खास पोस्ट

‘ठरलं तर मग’ या मालिकेची संपूर्ण कथा सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर आधारलेली आहे. नायिका मधुभाऊंना सोडवण्यासाठी अर्जुनशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेते. परंतु, सुभेदारांच्या घरी याबद्दल कोणाला काहीच माहीत नाहीये. दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल केवळ चैतन्य आणि कुसूम या दोघांनाच कल्पना असते.

jui
जुई गडकरी

दरम्यान, मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर अर्जुनचे वडील प्रताप सुभेदारांना तुरुंगातून सोडवण्यासाठी रविराज किल्लेदार पुढाकार घेत असल्याचं सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे.