Don 3 Teaser Out : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. गेली बरीच वर्षं प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतंच दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डॉन ३’ ची घोषणा केली.

मध्यंतरी शाहरुख खान या ‘डॉन ३’मध्ये दिसणार नसल्याची बातमी समोर आली होती. ती बातमी आता खरी ठरली आहे. काल ‘डॉन ३’ची घोषणा केल्यानंतर नुकतंच फरहानने त्याच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’च्या सोशल मीडिया हँडलवरुन ‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या रणवीर सिंहचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

आणखी वाचा : किंग खान शाहरुख खानच्या फेवरेट कॉफी मगची किंमत ऐकून व्हाल थक्क; मगचे फीचर्सही आहेत भन्नाट

या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये ‘डॉन’शी ओळख करून दिली आहे, तसेच हा नव्या जमान्याचा डॉन म्हणूनच फरहानने रणवीर सिंहला प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे. एकूणच हा फर्स्ट लूक आणि त्यातील रणवीर सिंहचा स्टायलीश अंदाज काही लोकांना आवडला आहे तर काहींनी रणवीर सिंहच्या निवडीवर संशय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टीझरखालील कॉमेंटमध्ये बऱ्याच लोकांनी रणवीरची खिल्ली उडवली आहे. तसेच शाहरुख नसेल तर डॉन ३ पाहणार नाही असंही काही नेटकऱ्यांनी कॉमेंट करत लिहिलं आहे. एकूणच जे प्रेक्षक शाहरुखच्या ‘डॉन ३’ची आतुरतेने वाट पहात होते त्यांचा हा टीझर पाहून हिरमोड झाला आहे. अद्याप चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. ‘डॉन ३’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द फरहान अख्तर याचं दिग्दर्शन करणार आहे.