अभिनेत्री रविना टंडन आणि करिश्मा कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ९० च्या दशकात दोघींनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघी ‘अंदाज अपना अपना’, ‘रक्षक’ व ‘आतिश’मध्ये एकत्र दिसल्या होत्या. मात्र, एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. हे भांडण एवढं वाढलं होतं की, दोघींनी एकमेकांचे केस ओढत मारामारीही केली होती. काय आहे तो किस्सा आणि काय होतं भांडणामागचं कारण? घ्या जाणून…
हेही वाचा- अमृता रावने ईशा देओलला सेटवर सगळ्यांसमोर दिलेली शिवी; चिडलेल्या अभिनेत्रीने उचलले होते ‘हे’ पाऊल
२००७ मध्ये ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडदरम्यान कोरिओग्राफर फराह खाननं करिश्मा कपूर व रविना टंडन यांच्यातील या भांडणाचा खुलासा केला होता. रविना टंडन आणि करिश्मा कपूर यांनी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आतिश’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. फराह खान या चित्रपटातील एक गाणं कोरिओग्राफ करत होती. या गाण्यात रविना आणि करिश्मा होत्या. शूटिंगदरम्यानच दोघांमध्ये भांडण झालं आणि एकमेकींचे केस ओढत दोघी मारामारी करू लागल्या.
हेही वाचा- तापसी पन्नू व स्वरा भास्कर या ‘बी ग्रेड’ अभिनेत्री; कंगनाने सांगितलं आपल्या या वक्तव्यामागील कारण
मिळालेल्या माहितीनुसार- या भांडणाचं कारण दुसरं कोणी नसून अभिनेता अजय देवगण होता. एकेकाळी करिश्मा आणि रविना दोघीही अजयच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यावेळी अजय देवगण रविना टंडनबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, असं सांगितलं जातं. रविनाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर करिश्मा आणि अजय एकमेकांच्या जवळ आले असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे रविना आणि करिश्मा एकमेकींसमोर आल्यानंतर भांडल्या असल्याचं सांगण्यात येतं.