बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन तिच्या बोल्ड स्टाइल आणि बेधडक वक्तव्यामुळे ओळखली जाते. ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रवीनाचे आजही लाखो चाहते आहेत. खासगी असो वा सामाजिक, रविना प्रत्येक विषयावर आपलं मत बिंधास्तपणे मांडताना दिसते. अनेकदा ती आपल्या वक्तव्यामुळेही चर्चेत आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रवीनाने इंटिमेट सीनबाबत मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- “माझ्या मुलीने किसिंग सीन दिला तर…”, रवीना टंडनने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “जर ती…”

रवीना टंडनने तिच्या करिअरमध्ये कधीच ऑन-स्क्रीन किसिंग सीन दिलेला नाही. आयुष्यभर तिने नॉन किसिंग सीन पॉलिसीचं काटेकोरपणे पालन केलं. एका मुलाखतीत रविनाने कोणत्याच चित्रपटात ऑन-स्क्रीन किसिंग सीन का दिला नाही, या मागचं मोठं कारण सांगितलं आहे.

रवीना म्हणाली, “किसिंग सीनमुळे मला खूप अस्वस्थ वाटतं. याआधी चित्रपटाच्या करारात अशा दृश्यांचा वेगळा उल्लेख केला जात नव्हता. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा ओठांचा चुकून माझ्या ओठांना स्पर्श झाला. मी लगेच माझ्या रुममध्ये गेले. मला त्यानंतर उलटी झाली. त्या घटनेनंतर सेटवर खळबळ माजली होती. त्यानंतर मी संबंधित अभिनेत्याची माफीही मागितली. त्यानंतर रवीनाने कधीच ऑन स्क्रीन कोणत्याही अभिनेत्याला किस केलं नाही.

हेही वाचा- “ती इंडस्ट्री सोडून जाणार होती”, ‘गदर’च्या दिग्दर्शकाचा प्रियांका चोप्राबद्दल मोठा खुलासा; म्हणाले, “नाकाच्या सर्जरीनंतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेब्रुवारी २००४ मध्ये रवीनाने अनिल थडानीबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाअगोदर काही काळ त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं. रवीना आणि अनिल यांना राशा आणि रणबीरवर्धन अशी दोन मुलं आहेत. एका मुलाखतीत रवीनाला विचारण्यात आलं की, राशाला चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन करावे लागले तर काय करशील? यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “हा संपूर्ण तिचा निर्णय आहे, ती तिच्या मर्जीनुसार करिअरचे निर्णय घेऊ शकते.”