अभिनेत्री रवीना टंडन गेली अनेक दशकं आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तिचे चित्रपट पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. कारण तिचा प्रत्येक चित्रपट हा नावीन्यपूर्ण असतो. रवीनाला गाड्यांची आवड आहे, हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. विशेष म्हणजे तिच्या प्रत्येक गाडीचा नंबर सारखा आहे. याचे कारण इतक्या वर्षांनी तिने उघड केले आहे.

आणखी वाचा : IND vs PAK T20 World Cup 2022: “ब्रदर नहीं…”; भारताच्या विजयानंतर अभिषेक बच्चनची विराट कोहलीसाठी खास पोस्ट

‘कारखाना शो’मध्ये रणविजय सिंहला नुकतीच तिने मुलाखत दिली. यावेळी रवीना टंडनने तिच्या पहिल्या कारच्या आठवणी सांगितल्या. तिने तिची पहिली गाडी ती फक्त 18 वर्षांची असताना खरेदी केली होती. रवीनाने सांगितले की एक जुनी स्पोर्ट्स कार होती. ती म्हणाली, “ज्या दिवशी मी १८ वर्षांची झाली, तेव्हा मी माझी पहिली कार घेतली. ती गाडी सेकंड हॅन्ड होती. पण तो गाडी मी माझ्या पहिल्या कमाईने विकत घेतल्याने माझ्यासाठी ती खूप खास होती. त्यानंतर माझी पहिली नवीकोरी गाडी ही मारुती १००० होती.”

रवीनाकडे असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या नंबर प्लेटमध्ये १६ हा आकडा आहे. यामागचे गुपितही तिने यावेळी उघड केले. ती म्हणाली, “आम्ही नेहमी शुभ दिनी गाडी खरेदी करतो. पण आमच्या प्रत्येक गाडीच्या नंबर प्लेटमध्ये १६ हा आकडा असतो, कारण माझ्या मुलीचा वाढदिवस 16 तारखेला असतो आणि आम्ही तिच्या वाढदिवशी प्रत्येक गाडी खरेदी करतो.”

हेही वाचा : ‘त्या’ एका ट्विटवरून रवीना टंडनचा राग झाला अनावर, म्हणाली, “ती लोकं शैतानापेक्षा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी रवीनाची ‘आरण्यक’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजच्या माध्यमातून तिने डिजिटल विश्वात पदार्पण केलं. या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिरीजच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर आता लवकरच त्याचा पुढील सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.