rekha birthday special when actress talk about her relationship with amitabh bachchan | अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं का? प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या, "मला आजपर्यंत असा पुरुष..." | Loksatta

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं का? प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या, “मला आजपर्यंत असा पुरुष…”

एकेकाळी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत्या.

Amitabh Bachchan, rekha, jaya bachchan, amitabh jaya, amitabh rekha, Amitabh Bachchan rekha love story, rekha, happy birthday rekha, rekha amitabh, reka jaya, rekha old photos, rekha photos, rekha news, rekha love life, rekha relationship, अम‍िताभ बच्‍चन, रेखा, जया बच्‍चन
एका मुलाखतीत रेखा यांना अमिताभ यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी खूपच स्पष्ट उत्तर दिलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा सौंदर्याच्या बाबतीत आजही आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या रेखा त्याच्या करिअरबरोबरच खासगी आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत राहिल्या होत्या. त्या काळी अभिनेत्री रेखा यांचं नाव सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलं गेलं होतं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा तर बऱ्याच झाल्या होत्या मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दोघांनी नेहमीच टाळलं होतं. पण एका मुलाखतीत रेखा यांना अमिताभ यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी खूपच स्पष्ट उत्तर दिलं होतं.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात नेमकं काय नातं होतं? याचा खुलासा ना कधी अमिताभ यांनी केला ना रेखा यावर काही बोलल्या. पण टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी एका मुलाखतीत रेखा यांना, “तुम्ही कधी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम केलं आहे का?” असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी रेखा यांनी बिनधास्तपणे आणि त्यांच्या हटके स्टाइलमध्ये याचं उत्तर दिलं होतं.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन आणि रेखा यांची अशी लव्हस्टोरी जी मोठ्या पडद्यावर गाजली, पण…

सिमी ग्रेवाल यांच्या प्रश्नावर रेखा उत्तरल्या, “हो, अर्थातच केलं. पण हा तर खूप सोप्पा प्रश्न आहे कारण मला आजपर्यंत असा एखादा पुरुष, महिला किंवा मुलंही नाही भेटलीत ज्यांचं अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम नाही. मग हा प्रश्न मलाच का? मी याला नकार देईन असं वाटतं का?” याच मुलाखतीत स्पष्टीकरण देताना रेखा पुढे म्हणाल्या होत्या, “अमिताभ यांच्यासह माझे कोणतेही व्यक्तीगत संबंध किंवा नातं नव्हतं आणि हेच सत्य आहे. वाद आणि अफवा यात कोणतंच सत्य नाही.”

आणखी वाचा- “रेखाजींनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या…” विशाखा सुभेदारने सांगितला ‘तो’ अनुभव

दरम्यान रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘सुहाग’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘राम बलराम’, ‘खून पसीना’ हे त्यांचे चित्रपट बरेच गाजले. पण ‘सिलसिला’ हा त्यांनी एकत्र काम केलेला अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही. आजही कोणत्याही पार्टीमध्ये एकत्र दिसणं दोघंही टाळतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-10-2022 at 08:49 IST
Next Story
“मला पॉपकॉर्न खाणारे प्रेक्षक… ” शाहरुख खानने व्यक्त केली होती खंत