What is Rekha afraid of: अभिनेत्री रेखा या त्यांच्या ‘आमिरी गरीबी’, ‘कोई मिल गया’, ‘अब इन्साफ होगा’, ‘इन्साफ की देवी’, ‘दिल है तुम्हारा’, ‘आझाद देश का गुलाम’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

रेखा यांच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. आता अभिनेते कबीर बेदी यांनी रेखा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. कबीर बेदी यांनी १९८८ साली प्रदर्शित झालेल्या खून भरी माँग या चित्रपटात रेखा यांच्याबरोबर काम करताना काय अनुभव आला, याबबात वक्तव्य केले.

“रेखाबरोबर काम करण्याची….”

कबीर बेदी यांनी नुकतीच सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. ते म्हणाले, “खून भरी माँग हा असा चित्रपट आहे, ज्यामुळे माझी ओळख निर्माण झाली. त्या चित्रपटातील भूमिकेसाठी मला ओळखले जाते. ती फिल्म सुपरहिट ठरली होती. मी मगदुम पीआय साठी हवाईमध्ये मी शूटिंग करत होतो. त्यावेळी मला राकेश रोशन यांचा फोन आला. त्या चित्रपटातील त्यांनी मला हिरोच्या भूमिकेसाठी विचारले. “

“मी त्यांना विचारले की हिरोच्या भूमिकेसाठी त्यांनी मला का निवडले. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की या चित्रपटातील हिरो नंतर खलनायक होतो. असे पात्र इतर कोणता अभिनेका साकारू इच्छित नाही. आतापर्यंत ज्या कलाकारांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यांना जर ही भूमिका दिली. तर ती भूमिका तितकी प्रभावी ठरणार नाही. फक्त तूच नायक आणि खलनायकाची भूमिका साकारू शकतोस.

कबीर बेदी पुढे म्हणाला, “ज्या क्षणी त्यांनी मला रेखा नायिका असल्याचं सांगितलं, त्या क्षणी मी हो म्हणालो. तिच्यासोबत काम करणं हा खूप मोठा सन्मान होता. तिने उमराव जानसाठी काही पुरस्कार जिंकले होते आणि ती एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. म्हणून मी माझे वेळापत्रक बदलले आणि त्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलो. रेखाबरोबर काम करण्याची संधी मला गमवायची नव्हती. रेखा खून भारी मांग चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत होती. तीने उत्तम अभिनय केला. तिच्या चित्रपटातील भूमिकेचे मोठे कौतुक झाले. या चित्रपटाने लोकांवर मोठा ठसा उमटवला.

चित्रपटापलीकडे रेखाबरोबर कसे नाते होते? यावर कबीर बेदी म्हणाले, “आमच्या मनात एकमेकांबद्दल आदर होता. रेखाला तिच्या गोष्टी तिच्यापुरत्या मर्यादित ठेवायला आवडतं. तिच्या खासगीपणाचं ती रक्षण करते. ती अतिशय संवेदनशील आहे. आपण दुखावले जाऊ अशी तिला भीती वाटते. म्हणून ती स्वतःचे रक्षण करते आणि मी त्याचा आदर करतो. आजही आम्ही खूप छान भेटतो, बोलतो. पण कधीतरी संध्याकाळी निवांत बसून एकमेकांना स्वत: च्या आयुष्याबद्दल गोष्टी सांगितल्या आहेत, असं कधीही घडलेलं नाही. आम्ही जेव्हा एकत्र काम केले, तेव्हाही आम्ही सेटवर छान बोलत असू. पण, कधीही शूटिंग संपल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन एकत्र वेळ घालवला नाही.”

दरम्यान, रेखा यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आजही त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.