मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून रेणुका शहाणे यांना ओळखले जाते. त्या कायमच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी मी टू मोहिमेची प्रचंड चर्चा झाली होती. यावेळी अनेक महिला कलाकारांनी पुढे येत, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली होती. या मोहिमेला रेणुका शहाणे यांनी पाठिंबा दिला होता. नुकतंच त्यांनी याबद्दल भाष्य केले आहे.

रेणुका शहाणे यांनी नुकतंच पिंकविला या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मी टू मोहिमेबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी लहानपणापासूनच प्रत्येक मुलीला हे बोलू नकोस, असा सल्ला दिला जातो, असे वक्तव्य केले आहे.
आणखी वाचा : “आशुतोष राणांशी लग्न झालं, तेव्हा मी…” पहिल्या पतीला घटस्फोट देण्याबद्दल रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा

अनेकदा महिलांना हे बोलू नका, असा सल्ला दिला जातो, तुम्हाला कधी कोणी असा सल्ला दिलाय का? असे या मुलाखतीत रेणुका शहाणे यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या, “हो अनेकांनी मला हा सल्ला होता. खरं सांगायचं तर लहानपणापासून प्रत्येक मुलीला हे बोलू नकोस, हे बोलायचं नाही, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे मला वाटतं की मी टू मोहिम ही फार महत्त्वाची होती. कारण त्या मोहिमेमुळे एक महिला १० वर्षांपूर्वी किंवा २५ वर्षांपूर्वी झालेला अत्याचाराची घटना सहज बोलू शकत होती. या मोहिमेद्वारे अनेक महिलांनी त्यांच्या मनातील तीव्र भावनांना वाट मोकळी करुन दिली.”

“या मोहिमेनंतर अनेकांनी २५ वर्षांनी ती महिला हे का बोलली? असे प्रश्न उपस्थित केले. पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही महिलांना बोलू कधी देता?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

“आपल्याकडे जास्तीत जास्त अत्याचार हे कुटुंबातच घडतात. जेव्हा तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मुलगी याबद्दल सांगतात, तेव्हा किती पालक त्यांनी सांगितलेल्या आधारावर वडिलधाऱ्यांशी किंवा कुटुंबाशी नातेसंबंध तोडतात? किंवा तोडण्यास तयार असतात? म्हणूनच मला असं वाटतं की या सर्व गोष्टी तिथून सुरु होतात. त्यामुळे गुन्हा करणाऱ्यांपेक्षा पीडित मुलाला किंवा मुलीलाच जास्त दोषी वाटायला लागते”, असेही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा : “हम आपके है कौन? या चित्रपटामुळे मी…”, रेणुका शहाणे रमल्या जुन्या आठवणीत

“अनेकहा एखाद्या मुलीने जास्त प्रश्न विचारले तरी लोक कंटाळतात. ती खूप प्रश्न विचारते? असे तिला बोललं जातं. पण त्या उलट जर एखादा मुलगा प्रश्न विचारत असेल तर त्या मात्र प्रोत्साहन दिले जाते. आपल्याकडे लोक स्त्रियांना नकारात्मक रुपात जास्त पाहतात”, असे रेणुका शहाणे यांनी म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रेणुका शहाणे या ‘हम आप के हैं कौन’ चित्रपटातून विशेष लोकप्रिय झाल्या. त्यांनी त्रिभंगा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांनी दिग्दर्शकाऐवजी महिला दिग्दर्शक म्हणून संबोधित करावे, असे अनेक मुलाखतीत म्हटले होते.