बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया बराच काळ चर्चेत होती. रिया आणि सुशांत बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करीत होते. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. आता रिया तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे आणि तिच्या व्यावसायिक आयुष्यासह तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करीत आहे.

हेही वाचा- “मुलीवर प्रेम असल्याचं…”, करण जोहरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “‘त्या’ शब्दामुळे नैराश्येत होतो”

मिळालेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती बिझनेसमन निखिल कामतला डेट करीत आहे. निखिल हा झिरोधा कंपनीचे संस्थापक आहे. ही एक वित्तीय सेवा कंपनी आहे; जी लोकांना शेअर बाजारातील शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये व्यवहार करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करते. निखिलने रिया चक्रवर्तीला डेट करण्यापूर्वी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरला डेट केले आहे. दोघे एकत्र फिरायला गेले होते. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मानुषी आणि निखिल एक वर्षापासून एकमेकांना डेट करीत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रियाने या व्यक्तींना केले आहे डेट

रिया चक्रवर्तीने विराट कोहलीचा मॅनेजर बंटी सजदेहलाही डेट केले आहे. बंटी सजदेह हा सोहेल खानची माजी पत्नी सीमा सजदेहचा भाऊ आहे. कामकाजाबद्दल बोलायचे झाले, तर रिया चक्रवर्ती सध्या एमटीव्ही रोडीज या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. शोमध्ये ती एका गँग लीडरच्या भूमिकेत आहे. शोमध्ये रियाबरोबर प्रिन्स नरुला, गौतम गुलाटी व सोनू सूदही आहेत. या शोमध्ये रियालाही खूप पसंत केले जात आहे.