करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लॉन्च केल्यावर दिग्दर्शक करण जोहरने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.

हेही वाचा : केदार शिंदेंचे ७ अंकाबरोबर आहे खास कनेक्शन; ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर खुलासा करत म्हणाले…

इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये एका चाहत्याने करण जोहरला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चित्रपटात शाहरुख खान आहे का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत करण म्हणाला, “नाही! या चित्रपटात शाहरुख नाहीये मात्र, त्याचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्याबरोबर कायम आहे.”

हेही वाचा : रणवीर-आलियाच्या “रॉकी और रानी…”च्या ट्रेलरमध्ये दिसली ‘या’ स्टारकिडची झलक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

“मी कोणाचेही नाव घेणार नाही परंतु, चित्रपटात तीन सरप्राईज कॅमिओ असणार आहेत. यामधील पुढचे गाणे ११ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित केले जाईल. या गाण्याची झलक तुम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.” असे करण जोहरने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये सांगितले. दुसऱ्या एका युजरने करणला, “शाहरुखबरोबर केव्हा चित्रपट बनवणार?” असा प्रश्न विचारला यावर त्याने, “जेव्हा शाहरुखची सहमती असेल तेव्हा आम्ही चित्रपट बनवू” असे उत्तर दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चित्रपटात आलिया भट्ट ‘राणी चॅटर्जी’ आणि रणवीर सिंह ‘रॉकी रंधवा’ ही भूमिका साकारणार आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘रॉकी और रानी…’च्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली असून, २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.