बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर मुलाबद्दल एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. रोहितचा मुलगा आता मोठा झाला असून तो शिक्षणासाठी परदेशात गेला आहे, त्यानिमित्त त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. रोहितने मुलगा ईशानबरोबरचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

“एखाद्या पुरुषाशी…”, सेक्रेटरीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपच्या दाव्यांदरम्यान रेखा यांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

रोहित शेट्टीचा मुलगाही येत्या काळात बॉलीवूमध्ये पाऊल ठेवेल. कारण त्याने फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला आहे. या खास प्रसंगी रोहितने एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मुलासोबत फिल्म स्कूलबाहेरचा एक फोटो शेअर केला आहे. ‘तुला प्ले स्कूलमध्ये सोडण्यापासून ते फिल्म स्कूलपर्यंतचा प्रवास, वेळ किती लवकर निघून जाते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रोहितचा मुलगा ईशानचेही वडिलांप्रमाणेच चित्रपट निर्माता बनण्याचे स्वप्न आहे. रोहितच्या या पोस्टवर बॉलीवूड कलाकार ईशानला शुभेच्छा देत आहेत. रणवीर सिंह, शिल्पा शेट्टी, रोहित रॉय, आर माधवन यांनी कमेंट करून ईशानचं अभिनंदन केलंय.